Pune Air Pollution : पुणेकरांनो काळजी घ्या..! प्रदुषणातील वाढीने पुण्याच्या हवेची गुणवत्ता ढासळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 11:28 IST2025-07-30T11:27:26+5:302025-07-30T11:28:02+5:30

पुण्याच्या रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची संख्या जुलै २०२५ पर्यंत तब्बल ४१ लाख २५ हजार ९६८ झाली आहे.

Pune Air Pollution: Punekar be careful Increase in pollution has worsened the air quality of Pune. | Pune Air Pollution : पुणेकरांनो काळजी घ्या..! प्रदुषणातील वाढीने पुण्याच्या हवेची गुणवत्ता ढासळली

Pune Air Pollution : पुणेकरांनो काळजी घ्या..! प्रदुषणातील वाढीने पुण्याच्या हवेची गुणवत्ता ढासळली

पुणे : शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाल्याने हवेची गुणवत्ता ढासळली आहे. शहरात २०२३- २४ या वर्षाच्या तुलनेत हवेचे उत्तम दिवस २७ ने कमी झाले आहेत. खराब हवेच्या दिवसामध्येही वाढ झाली आहे. पुण्याच्या रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची संख्या तब्बल ४१ लाख २५ हजार ९६८ झाली आहे. गेल्या वर्षभराच्या तुलनेत वाहनाच्या संख्येत तब्बल तीन लाखांनी वाढ झाल्याचे आकडेवारीहून स्पष्ट होत आहे. त्यामुळेही वायुप्रदुषण वाढल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेने तयार केलेल्या पर्यावरण अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ वर्षामध्ये हवेचे प्रदूषण वाढले असल्याने चांगल्या दिवसांची संख्या कमी झाली असून, खराब दिवस वाढले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शहरातील हवेची गुणवत्ता खराब झाली असून वर्षातील चांगल्या दिवसांची संख्या कमी होत चालली आहे. २०२३-२४ या वर्षात ३६५ दिवसांपैकी नागरिकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेले ‘चांगले’ दिवस ७९, समाधानकारक दिवस १४५, मध्यम दिवस १४० तर खराब दिवस केवळ एक होता. मात्र २०२४-२५ या वर्षात चांगले दिवस ५२, समाधानकारक दिवस १३७, मध्यम दिवस १७४ तर खराब दिवसांची संख्या ३ झाली आहे. त्यामुळे खराब दिवसांची संख्या दोनने वाढली असल्याचे पर्यावरण अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

पुण्याच्या रस्त्यावर ४१ लाख २५ हजार वाहनांचा 'भार'

पुण्याच्या रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची संख्या जुलै २०२५ पर्यंत तब्बल ४१ लाख २५ हजार ९६८ झाली आहे. त्यात इलेक्ट्रिक वाहने ३३ हजार ३८७, सीएनजी ४३ हजार ५३३ , हायब्रीड वाहनांची संख्या ५ हजार ७८१ आहे. २०२३-२४ या वर्षात शहरात असलेल्या एकूण वाहनांची संख्या ३८ लाख ६३ हजार ८४९ इतकी होती. त्यामुळे वर्षभरात वाहनांची संख्या तीन लाखांनी वाढली आहे. इलेक्ट्रीक, सीएनजी तसेच हायब्रीड वाहनांच्या वापरात वाढ होत असली तरी सर्वात अधिक वाहने पेट्रोलची आहे.

वर्षभरात डेंगूच्या रुग्णसंख्येत १ हजार ५८१ने वाढ

पुणे शहरात २०२३-२४ या वर्षात डेग्यूंच्या रूग्णांची संख्या ३ हजार ३७७ होती. त्यात यंदा म्हणजे २०२४ -२५ १ हजार ५८१ने वाढ होउन ती ४ हजार ९५८ झा

Web Title: Pune Air Pollution: Punekar be careful Increase in pollution has worsened the air quality of Pune.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.