शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कर्णकर्कश फटाक्यांसारखा 'सायलेन्सर'चा वापर, पुण्यात बुलेटचालकांवर कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 10:03 IST

हौशी गाडी चालकांकडून बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करून मॉडिफाइड सायलेन्सरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो

धनकवडी/चंदननगर : कर्णकर्कश सायलेन्सरचा वापर करणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करत पन्नास हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये ५० बुलेट चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच सायलेन्सर जप्त करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे स्वागत नागरिकांनी केले आहे.

शहरासह दक्षिण उपनगरात गाड्यांच्या बाबतीत हौशी कलाकारांची काही कमतरता नाही. याच हौशी गाडी चालकांकडून बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करून मॉडिफाइड सायलेन्सरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, कर्णकर्कश आवाज, फटाक्यांसारखा आवाज, ध्वनिप्रदूषण आणि नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या वतीने कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यात ५० बुलेट दुचाकी वाहने ताब्यात घेत या गाड्यांचे मॉडिफाइड सायलेन्सर काढून घेण्यात आले. व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुलेटचालकांवर वाहतूक अंमलदार यांच्यामार्फत ५० हजार रुपये दंडात्मक कारवाई करून या वाहनाचे मूळ सायलेन्सर बसवून तसेच ज्या गाड्यांना नंबर प्लेट नाही अशा गाड्यांवर कारवाई करून त्यांना नंबर प्लेट बसवून ही वाहने वाहनमालक यांच्या ताब्यात देण्यात आली असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रियांका गोरे यांनी सांगितले.

भारती विद्यापीठ परिसरात अनेक नामांकित शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते, तसेच ज्येष्ठ नागरिकांची ये-जाही सुरू असते. सातारा रस्ता आणि कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते, अशा परिस्थितीत सायलेन्सर बदलून त्यांचा कर्णकर्कश आवाज करत जाणाऱ्या रोडरोमिओच्या शायनिंगचा वृद्ध, लहान मुले, आजारी व्यक्तींना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने यापुढेही ही कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रियांका गोरे यांनी सांगितले.

खराडी पोलिसांचा ‘फटाके सायलन्सरवर’ बुलडोझर

खराडी परिसरातील मॉडीफाइड सायलन्सर बसवून कर्णकर्कश आवाज करत नागरिकांना त्रास देणाऱ्या बुलेटस्वारांवर अखेर खराडी पोलिसांनी धडक कारवाई करत सायलन्सरवर बुलडोझर चालविला. पोलिसांनी ठिकठिकाणी सापळा रचून तब्बल ४५ बुलेट व इतर दुचाकी जप्त करीत संबंधितांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली. जप्त वाहनांवरील मॉडीफाइड सायलन्सर काढून त्याठिकाणी कंपनीचे मूळ सायलन्सर बसविण्यात आले असून जप्त केलेल्या सायलन्सरवर बुलडोझर चालवून नायनाट करण्यात आला. खराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही तरुणांकडून बुलेट मोटारसायकलींना कंपनीचे सायलन्सर बदलून मॉडीफाइड सायलन्सर बसवले जात होते. या सायलन्सरमधून फटाक्यांसारखा मोठा आवाज निर्माण करून परिसरात दहशत निर्माण केली जात असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून वारंवार खराडी पोलिसांना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेष मोहीम राबवत पेट्रोलिंगदरम्यान सापळे लावून कारवाई केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Cracks Down on Loud Bullet Silencers, Fines Issued

Web Summary : Pune police are cracking down on modified bullet silencers, issuing fines and confiscating illegal devices after numerous noise complaints. Over 50,000 rupees were collected in fines from 50 bullet owners. Modified silencers were destroyed to curb noise pollution.
टॅग्स :PuneपुणेChandan NagarचंदननगरDhankawadiधनकवडीPoliceपोलिसbikeबाईकMONEYपैसा