Pune Accident : एवढी घाई कशाला, ट्रक दुभाजकावर..! वानवडी परिसरातील महामार्गावर अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:53 IST2026-03-11T16:52:48+5:302026-03-11T16:53:51+5:30
वानवडी - पुणे -सोलापूर महामार्गावरील टर्फ क्लब चौकात मंगळवारी पहाटे मिक्सर ट्रक दुभाजकावर चढून अपघात झाल्याची घटना घडली. या ...

Pune Accident : एवढी घाई कशाला, ट्रक दुभाजकावर..! वानवडी परिसरातील महामार्गावर अपघात
वानवडी - पुणे-सोलापूर महामार्गावरील टर्फ क्लब चौकात मंगळवारी पहाटे मिक्सर ट्रक दुभाजकावर चढून अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
वानवडी वाहतूक पोलिस चौकीसमोरील टर्फ क्लब चौक परिसरात हा अपघात झाला. कॅन्टोन्मेंट हद्दीतील भैरोबा नाला चौक ते मम्मादेवी चौक या दरम्यान महामार्गावर कमी उंचीचे दुभाजक आहेत आणि ते धुळीने माखलेले आहेत. तसेच अनेक ठिकाणी रिफ्लेक्टर नसल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना दुभाजकाचा अंदाज येत नसल्याची तक्रार चालकांकडून व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे मंगळवारी पहाटे मिक्सर ट्रक चालकाला दुभाजकाचा अंदाज न आल्याने ट्रक थेट दुभाजकावर चढल्याचे ट्रकमालकाकडून सांगण्यात आले. दरम्यान, यापूर्वीही याच भागात दुभाजकावर चारचाकी वाहन जाऊन एका ज्येष्ठ नागरिकाला जीव गमवावा लागल्याची घटना घडली होती.
मात्र, त्यानंतरही प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याची भावना स्थानिकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी याची दखल घेऊन महामार्गावर ठिकठिकाणी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.दुभाजकाची उंची वाढवा भविष्यात मोठा अपघात होण्याअगोदर वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चौकात दुभाजक सुरू होण्यापूर्वी रिफ्लेक्टर बसवावेत तसेच दुभाजकांची उंची वाढवावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. वाहतूक वळवली सकाळी ११ च्या दरम्यान ट्रक काढण्यासाठी ट्रक मालक व वानवडी वाहतूक पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. काहीकाळ या महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली होती.
महामार्गावरील दुभाजकांची उंची वाढविण्याची आणि रंगकाम करण्याची गरज आहे. त्याचबरोबर दुभाजक सुरू होण्याअगोदर रिफ्लेक्टर बसविल्यास अपघात टाळणे शक्य होईल. अपघाताच्या पार्श्वभूमीवर दुभाजकाचे रंगकाम आणि उंची वाढविण्यासंदर्भातील पत्र संबंधित प्रशासनाला दिले आहे. याचा पाठपुरावा करू - रणजित मोहिते, सहायक पोलिस निरीक्षक, वानवडी पोलिस विभाग