VIDEO : तरुण दबक्या पावलाने चालत आला अन्...; पोलीस मदत केंद्रासमोर घडली भयानक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 16:15 IST2026-02-18T16:10:46+5:302026-02-18T16:15:58+5:30
ही घटना सकाळी सुमारे सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान सुपा पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या मोरगाव पोलीस मदत केंद्रासमोर घडली.

VIDEO : तरुण दबक्या पावलाने चालत आला अन्...; पोलीस मदत केंद्रासमोर घडली भयानक घटना
मोरगाव (ता. बारामती) - मोरगाव येथील मुख्य चौकात आज सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली. एका अज्ञात तरुणाने भरधाव टेम्पोखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस याचा सखोल तपास करत आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
ही घटना सकाळी सुमारे सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान सुपा पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या मोरगाव पोलीस मदत केंद्रासमोर घडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पोलीस मदत केंद्रालगत असलेल्या एका दुकानात बसलेला तरुण अचानक बाहेर पळत आला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या टेम्पोखाली उडी मारली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
तरुण दबक्या पावलाने चालत आला अन्...; पोलीस मदत केंद्रासमोर घडली भयानक घटना #pune#accidentpic.twitter.com/yxzeonTQIf
— Lokmat (@lokmat) February 18, 2026
घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस ठाणे येथील कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद झाली असून त्याच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून घटनेमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.