मुळशीतील लवळे फाटा येथे भरधाव टेम्पोचा थरार; 5 वाहनांना धडक,अपघाताचा CCTV समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:33 IST2026-02-12T15:32:47+5:302026-02-12T15:33:33+5:30
टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोर असलेल्या वाहनांना धडक बसली.

मुळशीतील लवळे फाटा येथे भरधाव टेम्पोचा थरार; 5 वाहनांना धडक,अपघाताचा CCTV समोर
मुळशी :पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात लवळे फाटा येथे काल दुपारच्या सुमारास भीषण अपघात घडला. नियंत्रण सुटलेल्या भरधाव आयशर टेम्पोने रिक्षा, कार आणि दोन दुचाकींसह एकूण पाच वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघाताचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आयशर टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोर असलेल्या वाहनांना धडक बसली. या धडकेत एका दुचाकीस्वाराच्या पायावरून टेम्पोचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. तर अन्य चार ते पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुळशीतील लवळे फाटा येथे भरधाव टेम्पोचा थरार; 5 वाहनांना धडक,अपघाताचा CCTV समोर #pune#maharastra#accidentpic.twitter.com/d9xIHi36Y8
— Lokmat (@lokmat) February 12, 2026
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. धडक बसलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये भरधाव वेगाने येणारा टेम्पो दुचाकीस्वारांना उडवताना आणि पुढील वाहनांना धडक देताना स्पष्टपणे दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी मुळशीतील पौड पोलीस अधिक तपास करत असून, अपघाताचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.