Pune Accident :पुण्यात सीएनजी पंपावर धक्कादायक घटना; भाजप प्रवक्ते शहजाद पूनावालांच्या आईला कारची धडक, चालक फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:10 IST2026-02-04T13:05:36+5:302026-02-04T13:10:33+5:30

या अपघातात पूनावाला यांच्या आईंना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Accident Shocking incident at CNG pump in Pune; Driver runs over BJP spokesperson Shahzad Poonawala's mother, flees | Pune Accident :पुण्यात सीएनजी पंपावर धक्कादायक घटना; भाजप प्रवक्ते शहजाद पूनावालांच्या आईला कारची धडक, चालक फरार

Pune Accident :पुण्यात सीएनजी पंपावर धक्कादायक घटना; भाजप प्रवक्ते शहजाद पूनावालांच्या आईला कारची धडक, चालक फरार

पुणे - पुण्यातील एका सीएनजी पंपावर रात्रीच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेने शहर हादरले आहे. सीएनजी भरण्यासाठी उभ्या असलेल्या एका महिलेला कार चालकाने जाणीवपूर्वक उडवल्याची घटना घडली असून, या अपघातात भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आई गंभीर जखमी झाल्या आहेत.

घटनेनंतर संबंधित कार चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या अपघातात पूनावाला यांच्या आईंना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करत सांगितले की, “काही तासांपूर्वी एका घृणास्पद व्यक्तीने जाणीवपूर्वक माझ्या आईवर कार चालवली आणि नंतर तो फरार झाला. माझी आई अत्यंत दयाळू आणि चांगली व्यक्ती आहे. या वयात त्यांच्यासोबत असे घडणे अत्यंत वेदनादायक आहे.”



पूनावाला यांनी पुणे शहर पोलीस आणि महाराष्ट्र सरकारकडे त्वरित आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

दरम्यान, पुणे शहर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती आहे.

Web Title : पुणे: बीजेपी प्रवक्ता की मां को सीएनजी स्टेशन पर कार से कुचला, चालक फरार

Web Summary : पुणे में एक सीएनजी स्टेशन पर बीजेपी प्रवक्ता शहजाद पूनावाला की मां को एक चालक ने जानबूझकर कुचल दिया और फरार हो गया। गंभीर रूप से घायल, उन्हें सर्जरी की आवश्यकता है। पूनावाला ने तत्काल गिरफ्तारी और कड़ी कार्रवाई की मांग की है। पुलिस सीसीटीवी फुटेज का उपयोग करके जांच कर रही है।

Web Title : Pune: Driver Runs Over BJP Spokesperson's Mother, Flees CNG Station

Web Summary : In Pune, a driver intentionally ran over BJP spokesperson Shehzad Poonawalla's mother at a CNG station before fleeing. Critically injured, she requires surgery. Poonawalla seeks swift arrest and strict action. Police are investigating using CCTV footage.