पुण्यात जंगली महाराज रोडवर पीएमपीएमएल बसला कारची जोरदार धडक; सुदैवाने जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 16:58 IST2026-03-10T16:57:27+5:302026-03-10T16:58:14+5:30
वाहतुकीची गर्दी असताना कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने बसच्या मागील भागाला जोरदार धडक दिली.

पुण्यात जंगली महाराज रोडवर पीएमपीएमएल बसला कारची जोरदार धडक; सुदैवाने जीवितहानी टळली
पुणे : शहरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या जंगली महाराज रोडवर आज सकाळी पीएमपीएमएल बस आणि चारचाकी कारमध्ये अपघात झाला. कारने मागून पीएमपीएमएल बसला जोरदार धडक दिल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहतुकीची गर्दी असताना कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने बसच्या मागील भागाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. स्थानिक नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
विशेष म्हणजे, हा अपघात शाळेजवळ घडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पालक आणि स्थानिक नागरिकांनी या परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.