धनकवडी परिसरात डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:07 IST2026-02-20T11:06:33+5:302026-02-20T11:07:03+5:30

- तरुणी दुचाकीवरून जात असताना कात्रज कचरा रॅम्पच्या दिशेने येणाऱ्या डंपरने तिच्या दुचाकीला धडक दिली.

Pune Accident News Today A young woman riding a bike died on the spot after being hit by a dumper in Dhankawadi area. | धनकवडी परिसरात डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा जागीच मृत्यू

धनकवडी परिसरात डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा जागीच मृत्यू

धनकवडी - धनकवडी परिसरात कात्रज डेअरी जवळ आज सकाळी अपघात घडला. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका तरुणीला डंपरने जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी दुचाकीवरून जात असताना कात्रज कचरा रॅम्पच्या दिशेने येणाऱ्या डंपरने तिच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर स्थानिकांनी तत्काळ धाव घेत मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे. डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. 

दरम्यान, सकाळच्या वेळीच झालेल्या या अपघातामुळे स्थानिक नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली. कात्रज परिसरात वाढती वाहतूक, बेकायदेशीर पार्किंग आणि अवजड वाहनांची बेफाम धाव यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार करण्यात आली.

Web Title : धनकवडी के पास डंपर की टक्कर में युवती की मौत; क्षेत्र में आक्रोश

Web Summary : धनकवडी में कात्रज डेयरी के पास एक डंपर ट्रक ने एक युवती के स्कूटर को टक्कर मार दी, जिससे उसकी मौके पर ही मौत हो गई। स्थानीय लोगों ने कात्रज क्षेत्र में बढ़ते यातायात, अवैध पार्किंग और भारी वाहनों द्वारा लापरवाह ड्राइविंग पर आक्रोश व्यक्त किया है। पुलिस मामले की जांच कर रही है और डंपर चालक के खिलाफ आरोप दायर करने की तैयारी कर रही है।

Web Title : Daughter Killed in Dumper Collision Near Dhankawadi; Outrage in Area

Web Summary : A young woman died instantly after a dumper truck collided with her scooter near Katraj Dairy, Dhankawadi. Locals expressed outrage over increasing traffic, illegal parking, and reckless driving by heavy vehicles in the Katraj area. Police are investigating the incident and preparing to file charges against the dumper driver.