Pune Accident: गहुंजेत मर्सिडिज ट्रेलरला धडकली, चांदखेडमधील तीन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 22:24 IST2026-01-23T22:23:37+5:302026-01-23T22:24:55+5:30

मर्सिडिज अपघातात जखमी झालेल्या तिघांवर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

Pune Accident: Mercedes hits trailer in Gahunjet, three people from Chandkhed injured | Pune Accident: गहुंजेत मर्सिडिज ट्रेलरला धडकली, चांदखेडमधील तीन जण जखमी

Pune Accident: गहुंजेत मर्सिडिज ट्रेलरला धडकली, चांदखेडमधील तीन जण जखमी

शिरगाव : पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर मर्सिडिज ट्रेलरवर जाऊन धडकली. गहुंजे येथे शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता हा अपघात झाला. या घटनेमध्ये चांदखेड येथील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तिघेही मर्सिडिसमधून जात होते. त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. 

आकाश दीनानाथ सिंग (वय २३), सारिका सूर्यकांत तापकीर (वय ४४), प्रशीता वाळके (वय २४) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर पवना रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. किरकोळ जखमी झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरून एक कुटुंब सायंकाळी साडेचारच्या सुमारास मर्सिडिज कारने मुंबईच्या दिशेने चालले होते. गहुंजे येथे सिम्बॉयसिस महाविद्यालयाच्या समोरून जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रेलरला मर्सिडिजने मागून धडक दिली. 

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना बाहेर काढले. या अपघातात मर्सिडिज कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. 

सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल केले. ' मर्सिडीज कारमधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. तर रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title : पुणे दुर्घटना: गहुंज में मर्सिडीज ट्रेलर से टकराई, तीन घायल

Web Summary : पुणे-मुंबई एक्सप्रेसवे पर गहुंज के पास एक मर्सिडीज ट्रेलर से टकरा गई, जिससे चांदखेड़ के तीन लोग घायल हो गए। आकाश सिंह, सारिका तापकीर और प्रशीता वालके नामक घायलों का एक निजी अस्पताल में इलाज चल रहा है। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Pune Accident: Mercedes hits trailer in Gahunj, three injured.

Web Summary : Three individuals from Chandkhed were injured when their Mercedes collided with a trailer on the Pune-Mumbai Expressway near Gahunj. The injured, Akash Singh, Sarika Tapkir, and Prashita Walke, are receiving treatment at a private hospital. Police are investigating.