जांभुळवाडी दरी पुलावर मध्यरात्री अपघात; तीन ते चार वाहनांचे मोठे नुकसान; तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 10:24 IST2026-03-22T10:21:33+5:302026-03-22T10:24:12+5:30

- या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

pune accident at Jambhulwadi Valley Bridge at midnight; Three to four vehicles suffered major damage | जांभुळवाडी दरी पुलावर मध्यरात्री अपघात; तीन ते चार वाहनांचे मोठे नुकसान; तिघे जखमी

जांभुळवाडी दरी पुलावर मध्यरात्री अपघात; तीन ते चार वाहनांचे मोठे नुकसान; तिघे जखमी

कात्रज (पुणे) – कात्रज-नवले पूल परिसरात अपघातांची मालिका सुरूच असताना शनिवारी मध्यरात्री जांभुळवाडी दरी पुलावर आणखी एक गंभीर अपघात घडला. रात्री सुमारे पावणे बाराच्या सुमारास तीन ते चार वाहनांची एकमेकांवर धडक झाली. या घटनेत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. रात्रीच्या वेळेमुळे रस्त्यावर वाहतूक कमी असल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.

अपघातानंतर रस्त्यावर वाहनांच्या काचांचा मोठा खच पडला होता. पोलिस व स्थानिक प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले. दरम्यान, कात्रज-नवले पूल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या मार्गावर अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

Web Title : पुणे: जांभुलवाड़ी पुल पर मध्यरात्रि दुर्घटना; कई वाहन क्षतिग्रस्त, तीन घायल।

Web Summary : पुणे के कटराज के पास जांभुलवाड़ी पुल पर तीन से चार वाहनों की टक्कर से भीषण दुर्घटना हुई। वाहनों को काफी नुकसान हुआ, लेकिन तीन लोग मामूली रूप से घायल हो गए और उन्हें अस्पताल में भर्ती कराया गया। यातायात कम होने से बड़ी दुर्घटना टल गई। अधिकारियों ने मलबा हटाया, इलाके में सुरक्षा चिंताएँ बढ़ रही हैं।

Web Title : Pune: Midnight accident on Jambhulwadi bridge; multiple vehicles damaged, three injured.

Web Summary : A major accident occurred on Jambhulwadi bridge near Katraj, Pune, involving three to four vehicles. While vehicles suffered significant damage, three people sustained minor injuries and were hospitalized. Traffic was light, preventing a major disaster. Authorities cleared the wreckage, and safety concerns in the area are rising.