पुणे - नाशिक महामार्गावर ट्रकच्या धडकेत २५ वर्षीय युवक जागीच ठार, तर एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 20:33 IST2021-08-24T20:33:19+5:302021-08-24T20:33:28+5:30
ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावरील कार ला एका बाजुने धडक दिली. तसेच दुचाकीला पाठीमागच्या बाजुने जोरदार धडक दिली.

पुणे - नाशिक महामार्गावर ट्रकच्या धडकेत २५ वर्षीय युवक जागीच ठार, तर एक गंभीर जखमी
राजगुरुनगर : पुणे -नाशिक महामार्गावर चांडोली फाटा येथे ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २५ वर्षीय युवकाचा जागीच मुत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
अक्षय रामदास मुकणे रा. चांडोली तापकीरवस्ती (ता खेड ) असे अपघातामध्ये मूत्यू झालेल्या युवकाचे नांव आहे. हि घटना आज सांयकाळी पाऊने सहाच्या सुमारास घडली.
खेडपोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पुणे बाजु कडून नाशिक बाजुकडे भरधाव वेगाने जात असताना चांडोली फाटा येथे ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावरील कार ला एका बाजुने धडक दिली. तसेच दुचाकीला पाठीमागच्या बाजुने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी ट्रकने ५० फुटापर्यंत फरफटत नेली. अक्षय मुकणे यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच मुत्यू झाला. वसंत वाघ रा. चांडोली हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन जखमीला तात्काळ रुग्णालयात पाठवून अपघातग्रस्त ट्रकखाली अडकलेली दुचाकी क्रेनच्या सह्याने ट्रक उचलून दुचाकी बाहेर काढली.