शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी बुडविल्याचे सिद्ध करून दाखवाच

By admin | Updated: June 28, 2015 00:32 IST

शहरातील कोणत्याही सराफी व्यावसायिकांनी स्थानिक संस्था कर (एलबीटी) चा एक रुपयाही बुडविलेला नाही. पालिका तसेच कॉँग्रेसकडे हा कर बुडविल्याचा

पुणे : शहरातील कोणत्याही सराफी व्यावसायिकांनी स्थानिक संस्था कर (एलबीटी) चा एक रुपयाही बुडविलेला नाही. पालिका तसेच कॉँग्रेसकडे हा कर बुडविल्याचा एकही पुरावा असेल, तर त्यांनी तो सिद्ध करून दाखवाच, असे थेट आव्हान पुणे सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासन,तसेच कॉँग्रेसला दिले आहे. जून २०१५ पर्यंत असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी एलबीटी भरला असून, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत व्यापाऱ्यांनी भाजपाला दिलेल्या पाठिंब्याचा सूड उगारण्यासाठी केलेले हे षड्यंत्र असल्याचा दावा असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. शहरातील सराफ व्यावसायिकांकडून एलबीटीच भरला जात नसून, त्यांची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारने अनेक महिन्यांपासून परवानगी दिली नसल्याने कोट्यवधींचा एलबीटी थकला आहे. एलबीटी बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर जाऊन महापालिकेने बॅन्ड वाजवावा, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी शुक्रवारी केली होती. बालगुडे यांनी केलेल्या या आरोपांचे खंडन रांका यांनी पत्रकार परिषदेत केले.रांका म्हणाले, की एलबीटी लागू करण्यापूर्वी पालिकेच्या मागणीनुसार, सोन्यावर असलेली ३ रुपयांची जकात १० पैसे करण्यात आली. दागिने, हिऱ्यांवरील जकातही ५० पैसे करण्यात आली. जकात सुरू असताना, पालिकेने मिळालेले २५ कोटी रुपयांचे उत्पन्न आपोआपच कमी होऊन ते चार ते पाच कोटींच्या घरात आले. त्याचा अर्थ एलबीटी बुडवला असा होत नाही. बालगुडे यांनी ज्या ५० व्यावसायिकांची यादी दिली आहे. असोसिएशनचे ३१ सदस्य आहेत. त्यांनी जून २०१५ पर्यंत जकात भरल्याच्या सर्व पावत्या आमच्याकडे आहेत. बालगुडे यांच्यासह पालिकेवरही १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा कायदेशीर सल्ला घेऊन ठोकणार असल्याचे रांका म्हणाले. कोणत्याही तपासणीस तयार महापालिकेकडून वारंवार तपासणीसाठी शासनाची परवानही नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कायद्यात कोठेही तपासणीसाठी शासनाची परवानगी घेण्याची तरतूद नाही. त्यामुळे आम्ही कर बूडविला असल्याचे महापालिका सांगत असेल तर आम्ही केव्हाही तपासणीसाठी तयार आहोत. तसेच महापालिका मागेल ती कागदपत्रे सादर करण्याची आमची तयारी असल्याचे रांका यांनी यावेळी स्पष्ट केले. आज पर्यंत एकदाही पालिकेकडून आमच्याकडे तपासणीसाठी विचारणा करण्यात आलेली नाही. मात्र, पालिकेने आधी आमची अँसेसमेंट करावी आणि नंतर तपसणी करावी असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.सहा महिने जुने पत्र आत्ताच का ?बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिलेले पत्र, पालिका आयुक्तांनी सहा महिन्यांपूर्वी शासनास पाठविलेले आहे. असे असताना, कॉंग्रेसने आत्ताच का हे पत्र जाहीर केले. पत्रातही एलबीटी विभागाकडून दिलेली माहिती चुकीची व अर्धवट आहे. या पत्रात केवळ जकातीचे उत्पन्न एलबीटीमध्ये कमी झाल्याचे दाखविले आहे. मात्र, जकात आणि एलबीटीच्या दरातील फरक लपविण्यात आला असल्याचा आरोप रांका यांनी केला. तसेच कॉग्रेसला इतर व्यावसायिक न दिसता सराफी व्यावसायिकच का दिसतात, असा प्रतिसवालही रांका यांनी या वेळी केला.एलबीटी लागू करण्यापूर्वी महापालिकेच्या मागणीनुसार, सोन्यावर असलेली ३ रूपयांची जकात १० पैसे करण्यात आली. दागिने, हि-यांवरील जकातही ५० पैसे करण्यात आली. जकात सुरू असताना, पालिकेने मिळालेले २५ कोटी रूपयांचे उत्पन्न आपोआपच कमी होऊन ते चार ते पाच कोटींच्या घरात आले. त्याचा अर्थ एलबीटी बुडवला असा होत नाही. - फत्तेचंद रांकाअध्यक्ष, पुणे सराफ असोसिएशन