नाशिक कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरुद्ध पुण्यात आज निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 19:20 IST2025-12-06T19:18:58+5:302025-12-06T19:20:25+5:30
पुणे : नाशिकच्या कुंभमेळ्याला येणाऱ्या साधूंच्या रहिवाशांसाठी तेथील तपोवनमधील १८२५ वृक्ष तोडण्याच्या विरोधात राज्यभरातील पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. ...

नाशिक कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरुद्ध पुण्यात आज निदर्शने
पुणे:नाशिकच्या कुंभमेळ्याला येणाऱ्या साधूंच्या रहिवाशांसाठी तेथील तपोवनमधील १८२५ वृक्ष तोडण्याच्या विरोधात राज्यभरातील पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. पुण्यातील वृक्षप्रेमींही यात सक्रिय सहभाग म्हणून रविवारी (दि.७) दुपारी छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या पदपथावर निदर्शने करणार आहेत. ‘जवाब दो’ या संस्थेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सन २०२३ मध्ये निसर्गसंवर्धन व अन्य लोकोपयोगी उपक्रमांसाठी म्हणून या संस्थेची काही पुणेकरांनी स्थापना केली. त्यानंतर सातत्याने निसर्गसंवर्धनासाठी संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मिलिंद चव्हाण, सीमा काकडे, अविनाश पवार या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, साधूंच्या रहिवासासाठी म्हणून जवळपास २ हजार वाढलेल्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवणे अतिशय निर्दयी आहे. इतका प्रचंड रोष झाल्यानंतरही सरकार माघार घ्यायला तयार नाही.