शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील काँग्रेस भवन परिसरातील आंदोलन भोवले; भाजप- काँग्रेसच्या १०० ते १५० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 16:37 IST

दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत काँग्रेसचे ३, भाजपचे २ असे ५ कार्यकर्ते, २ पोलीस कर्मचारी आणि २ पत्रकार देखील जखमी झाले

पुणे : काँग्रेस भवन परिसरात रविवारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. झटापट, तसेच दगडफेकीची घटना घडल्यानंतर या प्रकरणी भारतीय जनता पक्षासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी परस्पर विरोधी फिर्यादी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल केल्या. परस्परविरोधी फिर्यादीनंतर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नगरसेवक धीरज घाटे, तसेच काँग्रेसचे पदाधिकारी नगरसेवक अरविंद शिंदे यांच्यासह १०० ते १५० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. १५) काँग्रेस भवनसमोर आंदोलन केले. सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेध केला. या वेळी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या घटनेत काँग्रेसचे तीन, तसेच भाजपचे दोन असे पाच कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. यासह दोन पोलिस कर्मचारी आणि दोन पत्रकार देखील किरकोळ जखमी झाले.

त्यानंतर रात्री उशीरा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नगरसेवक धीरज घाटे, युवा मोर्चाचे पदाधिकारी दुष्यंत मोहोळ यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत काँग्रेसच्या कार्यकर्त्या प्राची नितीन दुधाणे (४२, रा. दुधाणेनगर, कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमर काळंगे करत आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी पुनीत श्रीकांत जोशी (३५, रा. आयडियल काॅलनी, कोथरूड) यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, काँग्रेसचे पदाधिकारी अरविंद शिंदे, गौरव बाळंदे, अक्षय जैन, सागर धाडवे यांच्यासह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय पांढरे करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Clashes near Congress Bhavan lead to FIRs against workers.

Web Summary : BJP and Congress workers clashed near Congress Bhavan in Pune during a protest, resulting in stone-pelting and injuries. Police filed FIRs against both parties, including leaders, for the violence.
टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliceपोलिसagitationआंदोलनSocialसामाजिकPoliticsराजकारण