खराडीत मसाज पार्लरच्या नाावाखाली वेश्याव्यवसाय; महिलेसह ४ जणांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:21 IST2025-09-29T16:20:56+5:302025-09-29T16:21:08+5:30
मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवयास सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली

खराडीत मसाज पार्लरच्या नाावाखाली वेश्याव्यवसाय; महिलेसह ४ जणांविरोधात गुन्हा दाखल
पुणे : खराडी भागातील एका इमारतीत मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावरपोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. संदीप चव्हाण, रोहित शिंदे, गोपाळ, तसेच स्वाती उर्फ श्वेता विजय शिंदे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस शिपाई वर्षा सावंत यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर-खराडी भागातील एका फिटनेस क्लबजवळ असलेल्या इमारतीत आरोपी मसाज पार्लर चालवत होते. या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवयास सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. पोलिसांनी मसाज पार्लरवर छापा टाकून कारवाई केली. मसाज पार्लरमधून तरुणींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत मसाज पार्लरमधील तरुणींना आरोपींनी जादा पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोल स निरीक्षक सीमा ढाकणे तपास करत आहेत.
शहर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी पोल स आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. पोलीस आयुक्तांनी मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या चार दिवसात पोलिसांनी तीन मसाज पार्लरवर छापे टाकून कारवाई केली आहे. मार्केट यार्ड, तसेच पुणे-सातारा रस्त्यावरील धनकवडी भागातील मसाज पार्लरवर कारवाई करून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.