The prostitution business was started under the name of Ayurveda treatment; Incident on Satara Road in Pune | आयुर्वेद उपचाराच्या नावाखाली वेश्या व्यवसाय;पुण्यातील धक्कादायक प्रकार

आयुर्वेद उपचाराच्या नावाखाली वेश्या व्यवसाय;पुण्यातील धक्कादायक प्रकार

ठळक मुद्दे५ पीडित तरुणींची केली सुटका

पुणे : आयुर्वेद उपचाराच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. या ठिकाणाहून ३ पीडित तरुणींची सुटका केली आहे. दुसऱ्या एका घटनेत २ पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
सातारा रोडवरील आयुर्वेदा बॉडी ट्रिटमेंट सेंटरमध्ये तरुणींना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय केला होता. याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शहा'ज कॉम्प्लेक्स येथे छापा घालून तेथून ३ तरुणींची सुटका केली़ त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या दामाजी ऊर्फ करण मुरडे (वय ३८) याला अटक केली आहे.
बुधवार पेठेत दोन महिला तरुणींना आणून त्यांना डांबून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी महेश कदम व रमेश चौधर यांना मिळाली़ त्यानुसार पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून त्याची खात्री केली. खात्री पटताच पोलिसांनी छापा घालून तेथून २ तरुणींची सुटका केली.याठिकाणी वेश्या व्यवसाय करवुन घेणाऱ्या २ महिलांना अटक केली आहे. 
ही कामगिरी पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे उपनिरीक्षक श्रीधर खडके, कर्मचारी अण्णा माने, आश्विनी केकाण, मनिषा पुकाळे, संतोष भांडवलकर, हनमंत कांबळे, खाडे, गायकवाड यांनी केली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The prostitution business was started under the name of Ayurveda treatment; Incident on Satara Road in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.