शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मंडपाच्या परवानगीविनाच कार्यक्रम

By admin | Updated: August 22, 2015 02:18 IST

गणेशोत्सव, दहीहंडी व सांस्कृतिक कार्यक्रमांचा मंडप, स्वागत कक्ष, कमानी व स्टेज टाकण्यासाठी महापालिका तसेच पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. अन्यथा

हणमंत पाटील, पुणेगणेशोत्सव, दहीहंडी व सांस्कृतिक कार्यक्रमांचा मंडप, स्वागत कक्ष, कमानी व स्टेज टाकण्यासाठी महापालिका तसेच पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. अन्यथा, संबंधितांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल केले जातात. मात्र, महापालिकेतर्फे होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे मंडप व स्टेज टाकण्यासाठी पोलिसांकडून कोणतीही परवानगी घेतली जात नसल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. त्यामुळे दिव्याखालीच अंधार अशी महापालिकेची स्थिती आहे.शहरातील विविध कार्यक्रमांसाठी मांडव व कमानी सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात येतात. त्यासाठी वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतर महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून संबंधित अर्जदारांना परवानगी दिली जाते. कोणत्याही परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे जाहिरात, कमान व रनिंग मंडपावर स्थानिक क्षेत्रीय कार्यालयातर्फे कारवाई केली जाते. मात्र, गेल्या वर्षी कारवाईतून आठ हजार रुपयांचा दंड जमा झाला आहे.सार्वजनिक रस्त्यावर गणेशोत्सवाचे मंडप टाकण्यासाठी न्यायालयाने बंदीचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, विविध गणेश मंडळांनी सभा घेऊन त्यावर चर्चा केली. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवीन नियमावलीची मागणी केली होती. त्यावर गणेशोत्सवामध्ये कोणतेही विघ्न येऊ देणार नसल्याची घोषणा मुख्यमंंत्री फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. महापालिकेच्या भवन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१४ ते जुलै २०१५ या काळात पालिकेच्या विविध कार्यक्रमांसाठी कोणतीही पोलीस परवानगी घेण्यात आलेली नाही, अशी माहिती नगरसेवक बाळासाहेब बोडके व हृषीकेश बालगुडे यांनी ‘लोकमत’ला दिली.