प्राध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल; खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:56 IST2025-12-26T15:55:35+5:302025-12-26T15:56:30+5:30
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कुटुंबियांकडे याबाबतची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे

प्राध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल; खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
राजगुरूनगर: राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील प्राध्यापकाने मंदोशी (ता खेड ) येथे विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ( दि. २६ रोजी ) उघडकीस आली आहे.भानुदास मोतीलाल परदेशी ( वय ५२ रा. मोशी शिवालय अपार्टमेंट इंद्रायणी कॉलनी ता. हवेली ) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नांव आहे. त्यांच्या आत्महत्येने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
आत्महत्या केल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भानुदास परदेशी राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातून बुधवारी दि २४ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी घेऊन बेपत्ता झाले होते. बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात येत होता. दि. २५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पश्चिम भागातील मंदोशी येथील भैरवनाथ मंदिराचे शेजारी परदेशी यांची होंडा शाईन गाडी व काळी बॅग व मंदिराचे शेजारीच असलेल्या विहिरीचे कडेला चपला मिळून आल्या होत्या. खेड पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतला असता. रात्री दोन वाजता विहीरीत परदेशी यांचा मृतदेह मिळून आला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कुटुंबियांकडे याबाबतची चौकशी सुरु आहे. भानुदास परदेशी हे गेल्या २२ वर्षापासून हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात जीवशास्त्र हा विषय शिकवत होते.