शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

खासगी लक्झरी बसमुळे कोंडी

By admin | Updated: March 28, 2017 02:52 IST

सोलापूर रस्त्यावर मगरपट्टा चौक ते मांजरी फाटा चौकापर्यंत रात्री आठ ते साडेबारापर्यंत खासगी लक्झरी

हडपसर : सोलापूर रस्त्यावर मगरपट्टा चौक ते मांजरी फाटा चौकापर्यंत रात्री आठ ते साडेबारापर्यंत खासगी लक्झरी बस रस्त्यात उभ्या राहत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होऊन किरकोळ अपघात आणि वाहनचालकांची बाचाबाची दररोज सुरू असते. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांमध्ये पोलिसांविषयी तीव्र संताप व्यक्त केला.वाहतूककोंडी आणि गर्दी म्हटले की सोलापूर रस्ता डोळ््यासमोर उभा राहतो. शाळकरी मुले आणि कामगार घरी येईपर्यंत घरच्या मंडळींना काळजी लागलेला असते. तीन वर्षापूर्वी जुन्या पोस्ट कार्यालयासमोर दोन लक्झरी बसमध्ये सापडून एकाचा जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळी तत्कालीन आमदार महादेव बाबर यांनी वाहतुकीला अडथळा ठरणारे दुभाजक काढून वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर या ठिकाणी लक्झरी थांबण्याचे बंद झाले होते, असे नागरिकांनी सांगितले.मात्र, पुन्हा काही दिवसांनी या ठिकाणी लक्झरी बस थांबू लागल्या. आता दररोज रात्री या लक्झरी बस मगरपट्टा चौक ते मांजरीफाटा चौकापर्यंत थांबलेल्या असतात. त्यामुळे रात्री-अपरात्री कामावरून येणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते.(वार्ताहर)रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीलालक्झरीचालक प्रवासी मिळविण्यासाठी रस्त्यात बस उभ्या करतात. त्यामुळे वाहतूककोंडी होत असते. वाहतूककोंडी झाल्यामुळे अनेक वेळा रुग्णवाहिका अडकते.ाागरिकांना कोंडीतून बाहेर पडण्यासाठी रोज कसतर करावी लागतेच, पण रुग्णवाहिकांनाही वाट मिळण्यात अडचणी येतात. वाहतूक सुरळीत होण्यासाठी काही उपाययोजना केली जात नसल्याने रग्णांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागतो. यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.