विद्यार्थी हिताला प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:08 IST2020-12-07T04:08:46+5:302020-12-07T04:08:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी रविवारी सकाळी समाज कल्याण आयुक्त कार्यालयास भेट ...

Prioritize student interests | विद्यार्थी हिताला प्राधान्य द्या

विद्यार्थी हिताला प्राधान्य द्या

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी रविवारी सकाळी समाज कल्याण आयुक्त कार्यालयास भेट देऊन समाज कल्याण विभागामार्फत राज्यात राबविल्या जात असलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला.तसेच विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन शिष्यवृत्ती व विद्यार्थ्यांच्या इतर प्रश्नाबाबत तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना अधिका-यांना दिल्या.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयुक्तालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विश्वजीत कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. समाज कल्याण विभागातील अधिका-यांशी चर्चा करताना कदम यांनी विविध योजनांचा आढावा घेतला. याप्रसंगी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, समाज कल्याणचे अतिरिक्त आयुक्त दिलीप डोके, सह आयुक्त भारत केंद्रे,उपायुक्त प्रशांत चव्हाण, उपायुक्त रवींद्र कदम पाटील,प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळुंकी, सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड उपस्थित होते.

--------------------------

Web Title: Prioritize student interests