शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपदाची पंतप्रधानांनी दिली हमी : आठवले

By admin | Updated: April 9, 2015 05:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माझा विश्वास आहे. त्यानुसार मला केंद्रात मंत्रिपद देण्याची हमी त्यांनी दिली असल्याचा विश्वास रिपब्लिकन पार्टी

दौंड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माझा विश्वास आहे. त्यानुसार मला केंद्रात मंत्रिपद देण्याची हमी त्यांनी दिली असल्याचा विश्वास रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दौंड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशात आणि राज्यात महायुतीची सत्ता आल्यामुळे सत्तेत असणाऱ्यांना चांगले दिवस आले आहेतच; परंतु सर्वसामान्य जनतेलादेखील चांगले दिवस येतील. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया सर्व जाती-धर्मांतील लोकांना सहभागी करून घेणारी आहे. ज्यामुळे आरपीआय पक्ष आहे त्यापेक्षा अधिक भक्कमपणे उभा राहण्यास मदत होईल. शेतकऱ्यांच्या पडीक जमिनी भूसंपादनासाठी घ्या; मात्र जिथे मुबलक पाणी आहे आणि शेती व्यवसाय जोमात आहे अशा जमिनी सरकारने घेऊ नयेत. ज्या जमिनी संपादित केल्या, त्यांना चांगला भाव दिला पाहिजेत. जोपर्यंत पर्यायी जागा मिळत नाही, तोपर्यंत रेल्वे झोपडपट्टी हटवू देणार नाही. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चादेखील केली आहे, असे आठवले म्हणाले. (वार्ताहर)