पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी: रत्नाकर महाजन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 08:15 PM2020-06-26T20:15:50+5:302020-06-26T20:16:48+5:30

राजीव गांधी फाउंडेशनने चीनकडून देणगी घेतल्याच्या आरोपांवर देखील रत्नाकर महाजन यांनी यावेळी भाष्य केले.

Prime Minister Narendra Modi should apologize to the country: Ratnakar Mahajan |  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी: रत्नाकर महाजन

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी: रत्नाकर महाजन

Next

पुणे : केंद्र सरकारला आर्थिक नितीमध्ये अपयश आले असून कोरोनाच्या उपाययोजनांमध्येही हे केंद्र शासन अपयशी ठरले आहे. आता, चीनच्या उदाहरणावरुन त्यांच्या परराष्ट्र नितीमध्येही अपयश आल्याचे समोर आले आहे. हे अपयश झाकण्यासाठी काँग्रेसवर चिखलफेक सुरु असून चीनकडून देणगी घेतल्याचे उत्खनन  भाजपाने केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन केला. पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
१९६२ च्या लढाईवेळी भारताचा पराभव झाला होता. परंतू, त्यावेळी सैनिकांनी बलिदान केले त्यांचा भाजपाने अपमान केला आहे. त्यावेळी अनेक ठिकाणांहून  चिनी सैनिकांना माघार घ्यावी लागली होती. जनसंघापासून भाजपापर्यंत त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकीय पक्षांबरोबर कधीच जुळवून घेतले नाही. राजीव गांधी फाऊंडेशनने चीनकडून देणगी घेतल्याचे सांगितले जात आहे. जी यादी प्रसिद्धीस दिली आहे त्या यादीमध्ये ४० ते ५० संस्थांची नावे आहेत. त्यापैकी एक राजीव गांधी फाऊंडेशन आहे. त्या यादीतील अन्य नावे कोण, त्यांचे संस्थापक, पदाधिकारी कोण हे जाहीर करा. इतरांवर आरोप करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आजवर कधी गुरुपौर्णिमेच्या दिवशी घेतल्या जाणा-या  दक्षिणेचा हिशोब दिला आहे का?, त्याचे कधी आॅडीट केले आहे का? याचे उत्तर भाजपाने द्यावे असेही महाजन म्हणाले.

Web Title: Prime Minister Narendra Modi should apologize to the country: Ratnakar Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.