शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

विड्याच्या पानाचे दर घसरले; शेतकरी अडचणीत, महादेव जानकरांचा थेट कृषिमंत्री कोकाटे यांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:24 IST

महाराष्ट्रात नागवेलीच्या विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकी गावाची अर्थकारणाची बाजू मात्र कमकुवत होत चालली आहे

निमगाव केतकी (इंदापूर) : नागवेलीच्या विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात राज्याचे माजी पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री विधान परिषदेचे आमदार महादेव जानकर यांनी रविवारी पान बाजाराला भेट दिली. पानमळे धारक, व्यापारी ,शेतकऱ्यांशी संवाद साधत सध्या पानाचे दर पडले असून सहा हजार पानांना केवळ अडीचशे रुपये येत आहेत. त्यामुळे पान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याने यावर मार्ग काढावा अशी विनंती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दूरध्वनी वरून संवाद साधला यावेळी कोकाटे यांनी देखील लवकरच आपण यावर मार्ग काढू असे आश्वासित केले.

रविवारी १३  जुलै रोजी माजी मंत्री,आमदार जानकर यांनी विड्याच्या पानांचा बाजार दर रविवारी आणि बुधवारी भरत असलेल्या निमगाव केतकी ग्रामपंचायत समोरून पान बाजारात भेट दिली. यावेळी पान उत्पादक मळेकरी व विक्रेते ब्रह्मदेव शेंडे, गोरख आदलिंग यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात नागवेलीच्या विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकी गावाची अर्थकारणाची बाजू मात्र कमकुवत होत चालली आहे. पिकवतो त्याला दाम मिळत नाही. गुटखा, मावा, मसाला आदी चैनीच्या वस्तू बाजारात सर्रास विकल्या जातात. यावर शासनाचे निर्बंध आणखी कडक केले पाहिजेत. मात्र आयुर्वेदात उल्लेख असलेले शरीरास पचन क्रियेसाठी रक्त शुद्धी व वाढीसाठी बहुउपयोगी असलेले पान टपरीवर महाग विकत असले तरी प्रत्यक्षात पिकवणाऱ्याला अत्यंत कमी पैसे मिळत आहेत. पानमळ्यामध्यातून ग्राहकाच्या हातात येई पर्यंतच्या प्रवासात पान उत्पादकांना मोठा खर्च सोसावा लागतो. सध्या फापडा सेज (कळी) गबाळ या  पानांचे दर गडगडले असून सहा हजार पानांच्या डागाला केवळ अडीचशे रुपये मिळत आहेत.

आमदार महादेव जानकर यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दूरध्वनी वरून संवाद साधत शेतकऱ्यांची कैफियत सांगून खाण्याच्या पानाला दर्जा मिळावा. तसेच तो पिकवणाऱ्या मळेधारकांना चार पैसे राहावे. अशा पद्धतीने ठोस  उपाययोजना शासन स्तरावर करावी अशी मागणी केली. यावर मंत्री कोकाटे यांनी देखील लवकरच यात मार्ग काढणार असल्याचे आश्र्वासित  केले.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरMahadev Jankarमहादेव जानकरManikrao Kokateमाणिकराव कोकाटेFarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार