उलटी आल्याची बतावणी; लक्ष नसल्याची संधी साधून पीएमपी प्रवासी महिलेचे ७ लाखांचे दागिने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 17:25 IST2026-04-01T17:24:14+5:302026-04-01T17:25:12+5:30

महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून पिशवीत ठेवलेले सहा लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्या महिलेने लांबविले, असे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे

Pretending to vomit; Taking advantage of the woman's inattention, PMP passenger stole jewellery worth 7 lakhs | उलटी आल्याची बतावणी; लक्ष नसल्याची संधी साधून पीएमपी प्रवासी महिलेचे ७ लाखांचे दागिने लंपास

उलटी आल्याची बतावणी; लक्ष नसल्याची संधी साधून पीएमपी प्रवासी महिलेचे ७ लाखांचे दागिने लंपास

पुणे : पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून सहा लाख ९० हजार रुपयांचे साेन्याचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी एका महिलेविरोधात वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार ५४ वर्षीय महिला मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हडपसर गाडीतळ ते चिंचवड या मार्गावरील पीएमपी बसमधून ३० मार्च रोजी सकाळी दहाच्या सुमारास प्रवास करत होत्या. पुणे-सोलापूर रस्त्यावर हडपसमधील वैदुवाडी परिसरात पीएमपी बसमध्ये तक्रारदार महिलेच्या शेजारी थांबलेल्या एका महिलेने उलटी आल्याची बतावणी केली. तक्रारदार महिलेला धक्का दिला. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून पिशवीत ठेवलेले सहा लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्या महिलेने लांबविले, असे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक इनामदार पुढील तपास करत आहेत. दरम्यान, पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेचे दागिने लांबविण्याची आणखी एक घटना भवानी पेठ परिसरात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला पीएमपी बसमधून प्रवास करत होत्या. महिलेच्या शेजारील आसनावर बसलेल्या महिलेने त्यांना बोलण्यात गुंतवले. हातचलाखी करून त्यांच्या गळ्यातील २८ हजारांची सोनसाखळी चोरून नेली. पुढील तपास साहाय्यक पोलिस फौजदार वाघेरे करत आहेत.

 

Web Title : बस में पीएमपी यात्री के ₹7 लाख के गहने चोरी हो गए।

Web Summary : एक पीएमपी यात्री ने ₹6.9 लाख के सोने के गहने खो दिए जब एक सह-यात्री ने बीमारी का नाटक किया और उसके बैग से चोरी कर ली। एक अन्य घटना में भवानी पेठ में एक वरिष्ठ नागरिक ने बस में एक सोने की चेन खो दी।

Web Title : PMP passenger loses ₹7 lakh jewelry in theft on bus.

Web Summary : A PMP passenger lost ₹6.9 lakh worth of gold jewelry after a co-passenger feigned illness and stole from her bag. Another incident involved a senior citizen losing a gold chain on a bus in Bhavani Peth.