शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

सध्याचे सरकार संविधानाची चौकट मोडू पाहतेय : बाळासाहेब थोरात 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 1:25 PM

समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा विचार संविधाच्या मुलभूत तत्वांमध्ये आढळून येतो.

ठळक मुद्देउल्हास पवार आणि आबा बागूल यांना आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार प्रदान

पुणे : समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा विचार संविधाच्या मुलभूत तत्वांमध्ये आढळून येतो. त्या अर्थाने पसायदान आणि संविधानाच्या प्रस्तावनेत समता हे एक सूत्र दिसून येते. सध्या ज्या विचारधारेचे सरकार सत्तेत आलेले आहे, ती विचारधारा संविधानाची चौकट मोडू पाहत आहे, अशी खंत राज्याचे माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. हे सरकार उलथवून टाकण्यासाठी, संविधानाच्या सुरक्षेसाठी एकविचार एकध्येयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.माजी नगरसेवक लोकनेते दयाराम राजगुरू यांच्या ७४ व्या जन्मदिनानिमित्त लोकनेते दयाराम राजगुरू चॅरिटेबल ट्रस्टतर्फे यंदाच्या वर्षापासून सुरू करण्यात आलेला आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि नगरसेवक आबा बागुल यांना थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी काँग्रेसचे महासचिव माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे  होते. यावेळी नगरसेविका लता राजगुरू, रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, नगरसेविका चाँद बी नदाफ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर उल्हास ढोले-पाटील, माजी महापौर रजनी त्रिभुवन, पीएमपीचे माजी अध्यक्ष भीमराव पाटोळे,  नगरसेवक रफीक शेख, अभय छाजेड, अविनाश बागवे, पँथरचे सुखदेव सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.थोरात म्हणाले, ‘उल्हासदादा हे वारकरी संप्रदायाचे आहेत आणि वारकरी संप्रदायाच्या ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाच्या माध्यमातून समतेचा विचार मांडला होता. तोच समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा विचार संविधाच्या मुलभूत तत्वांमध्ये आढळून येतो. त्या अर्थाने पसायदान आणि संविधानाच्या प्रस्तावनेत समता हे एक सूत्र दिसून येते. सध्याचे सरकार हे अल्पकालीन टिकणा-या विचारधारेवर सत्तेत आले आहे. काँग्रेसचा विचार हा शाश्वत विचार असून तो विचार संपणार नाही.किशोर गजभिये म्हणाले, ‘सध्या मुलभूत हक्कांनाच सुरूंग लावला जात आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जोपर्यंत या देशातील दलित, मुस्लीम, अल्पसंख्यांक सुरक्षित नाही, तोपर्यंत आपला देश सुरक्षित नाही. ज्या दिवशी भारत संपूर्ण हिंदू राष्ट्र म्हणून उदयास येईल, तो दिवस देशासाठी सगळ्यात मोठी आपत्ती असेल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून ठेवले आहे. तो दिवस दूर नाही, असे वाटण्याजोगे वातावरण सभोवताली निर्माण झाले आहे.’ लता राजगुरू यांनी प्रास्ताविक केले. फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरBalasaheb Thoratआ. बाळासाहेब थोरातBJPभाजपाGovernmentसरकार