शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंटच्या रस्त्यांवर बेसुमार चेंबर्स

By admin | Updated: April 7, 2015 05:48 IST

शहरातील अनेक छोटे-मोठे रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम जोरात सुरू आहे, या रस्त्यांमध्ये गरज नसतानाही ड्रेनज व पावसाळी चेंबरची

दीपक जाधव, पुणेशहरातील अनेक छोटे-मोठे रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम जोरात सुरू आहे, या रस्त्यांमध्ये गरज नसतानाही ड्रेनज व पावसाळी चेंबरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविली जात आहे. ठरवून दिलेल्या निकषानुसार ३० मीटरच्या अंतरावर चेंबर्स असणे आवश्यक असताना निकष वाऱ्यावर बसवून दोन-दोन फुटांवर चेंबर उभारण्यात येत आहेत. यामुळे रस्त्यांची वाट लागत असून पैशांची प्रचंड उधळपट्टी होत आहे.शहरामध्ये एक लाखांपेक्षा जास्त ड्रेनेज आहेत. त्यातील अनेक ड्रेनेज रस्त्यांच्या मधोमध असणे, समान पातळीवर नसणे, त्याचे झाकण खचलेले असणे अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. याचा वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. ड्रेनेजच्या वाईट अवस्थेमुळे अपघाताच्या घटनाही सतत घडत असतात. त्यातच नव्याने बांधण्यात येत असलेल्या सिमेंट रस्त्यांवर ड्रेनेज व पावसाळी चेंबरची संख्या वाढविण्यात येत आहे. महापालिकेच्या निकषानुसार ३० मीटरवर एक ड्रेनेज उभारणे आवश्यक आहे. मात्र या निकषाचे पालनच केले जात नाही. विशेषत: पेठांमध्ये ड्रेनेजच्या चेंबर्सची संख्या खपूच वाढत असल्याचे लक्षात आल्यानंंतर आम्ही पुणेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी सहाणे यांनी मलनिस्सारण विभागाकडे याबाबतची माहिती मागितली. शनिवार वाडाच्या शिवाजी रस्त्यावरील गेटपासून ते त्वेष्टा कासार मंदिरापर्यंत सिमेंटचा रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याठिकाणी फुटाफुटांवर चेंबर्स बसविण्यात आले. त्याबरोबर डांबरी रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात चेंबर्स असून त्यांची दुरवस्था झालेली आहे. गांजवे चौक ते विठ्ठल मंदिर, शिवाजी रस्ता, शीतळादेवी ते खडकमाळ आळी, शाहू चौक ते मासे आळी, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, बिबवेवाडी रस्ता, आंबेमाता चौक, सुखसागरनगर, वानवडी तसेच पेठांमधील गल्ली-बोळातील रस्त्यांवरील चेंबर्सची दुरवस्थेत असल्याचे दिसून आले. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे रवी सहाणे यांनी पुराव्यानिशी याबाबतची माहिती सादर केली. त्यानंतर बकोरिया यांनी सहाणे यांच्यासमवेत जाऊन याची नुकतीच पाहणी केली असून लवकरच याबाबत योग्य ती कार्यवाही करू, असे सांगितले आहे.चेंबर्सबाबत माहिती १५ पैकी केवळ औंध, विश्रामबागवाडा, धनकवडी, भवानी पेठ, हडपसर, सहकारनगर, घोले रोड या ७ कार्यालयांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यापैकी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत किती चेंबर्स आहेत, याची माहिती केवळ भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडेच उपलब्ध आहे.