शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन प्रकरण; भाजप पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 20:36 IST

याबाबत महिला पोलिस अधिकाऱ्याने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रमोद कोढरे (रा. नातूबाग, सदाशिव पेठ, बाजीराव रस्ता) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी प्रमोद कोंढरे याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा फरासखाना पोलिसांकडून दाखल करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सोमवारी (दि.२३) पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी बंदोबस्तात असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत महिला पोलिस अधिकाऱ्याने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रमोद कोढरे (रा. नातूबाग, सदाशिव पेठ, बाजीराव रस्ता) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीमध्ये छत्रपती शिवाजी मार्गावरील प्रस्तावित भुयारी मार्गाचे पाहणी दौऱ्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे सोमवारी पुण्यात आले होते. शहरात गडकरी यांचे विविध कार्यक्रम होते. त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी रस्त्यावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी भाजपचे कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी सकाळी दहाच्या सुमारास रासने कार्यकर्त्यांसोबत शनिवारवाडा परिसरात थांबले होते. कार्यक्रम सुरू होण्यास वेळ होता. त्यामुळे रासने हे कार्यकर्त्यांसह कसबा पेठ चौकी परिसरात असलेल्या एका उपाहारगृहात चहा प्यायला गेले. त्यावेळी मी तेथे होते. रासने यांनी मला चहा पिण्याचा आग्रह केला. माझ्यासोबत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसोबत मी चहा प्यायला उपाहारगृहात गेले. त्यावेळी रासने आणि कार्यकर्ते उपहारगृहासमोर थांबले होते. तेथे गर्दी झाली होती, असे महिला पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

त्यावेळी तेथे असलेला प्रमोद कोंढरे हा माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होता. ही बाब मला खटकली होती. मात्र, बंदोबस्तास असल्याने मी दुर्लक्ष केले. चहा पिल्यानंतर मी रासने यांच्याशी थोड्या वेळ चर्चा केली. तेथून जात असताना मला कोणीतरी अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचे जाणवले. मी मागे वळून पाहिले, तेव्हा ती व्यक्ती प्रमोद कोंढरे होती. त्यावेळी बंदोबस्तात असल्याने मी दुर्लक्ष केले. त्यानंतर पोलिस आयुक्त कार्यालयातील बैठक पार पाडून मी नवी पेठेतील एस.एम. जोशी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास गेले. बंदोबस्तावेळी किळसवाणी घटना घडल्याने मी अस्वस्थ झाले होते. त्यानंतर मी कसबा पेठ पोलिस चौकी परिसरातील उपहारगृह परिसरात गेले. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांंनी केलेले चित्रीकरण तपासले. तेव्हा कोंढरे याने अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचे चित्रीकरणात दिसून आले. बंदोबस्त आटोपल्यानंतर मी या घटनेची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

यापूर्वी प्रमोद कोंढरे याच्याविरोधात २०१५ मध्ये खडक पोलिस ठाण्यात धमकावून वर्गणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१० आणि २०११ मध्ये कोंढरे विरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. डेक्कन पोलिस ठाण्यात देखील २०२२ मध्ये त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस