'खड्डा ७२ तासांत बुजविणार', नागरिक की महापालिका? रोड मित्र ॲप बंद पडल्याची अधिकाऱ्यांना कल्पनाही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 09:33 IST2026-03-12T09:33:15+5:302026-03-12T09:33:58+5:30

रोड मित्र अँपमध्ये खड्ड्यांबाबत तक्रार केल्यानंतर खड्डा ७२ तासांत बुजविणार असल्याचा दावा महापालिकेचे आयुक्त किशोर राम यांनी केला होता

'Pothole will be filled in 72 hours', citizen or municipal corporation? Officials have no idea that Road Mitra app has been shut down | 'खड्डा ७२ तासांत बुजविणार', नागरिक की महापालिका? रोड मित्र ॲप बंद पडल्याची अधिकाऱ्यांना कल्पनाही नाही

'खड्डा ७२ तासांत बुजविणार', नागरिक की महापालिका? रोड मित्र ॲप बंद पडल्याची अधिकाऱ्यांना कल्पनाही नाही

पुणे : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारींसाठी आणि खड्डे दुरुस्तीला गती मिळण्यासाठी महापालिकेने मोठा गाजावाजा करून सुरू केलेले ‘रोड मित्र’ हे ॲप बंद पडले असून याबाबत महापालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर त्यांना याची काहीच कल्पना नसल्याचे समोर आहे.

शहरातील विविध स्वरुपाच्या समस्या महापालिकेपर्यंत पोहोचाव्यात आणि समस्यांचे वेळेत निराकरण व्हावे, यासाठी महापालिकेने पीएमसी केअर हे ॲप विकसित केले आहे. या ॲपवर नागरिकांनी तक्रार केल्यानंतर किंवा त्याचा फोटो पाठवल्यानंतर संबंधीत नागरिकास काम झाल्याचे मेसेज किंवा फोटो पाठविला जात होता. मात्र, अनेकवेळा समस्यांचे निराकरण न होताच संबंधित नागरिकांना ती सोडवल्याचा मेसेज जात होता.

महापालिकेतील विविध कामांना आणि नागरिक प्रश्न मार्गी लागण्यासाठी आयुक्तांकडून प्रशासनाची गतिमानता वाढविण्याचे काम केले जात आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्पर असले पाहिजे. शहर खड्डेमुक्त करण्यासाठी पथ विभागाने मोठा गाजावाजा करत रोड मित्र हे नवीन ॲप विकसीत केले आहे. या ॲपद्वारे नागरिक रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते थेट महापालिकेच्या पथविभागाला पाठवू शकतील. खड्ड्यांबाबत तक्रार केल्यानंतर खड्डा ७२ तासांत बुजविणार असल्याचा दावा यावेळी आयुक्त किशोर राम यांनी केला होता.

दरम्यान, खड्डा बुजविण्याची जबाबदारी ही उपअभियंत्यांवर निश्चित करून कर्तव्यात कसूर केल्यास त्यांच्यावर थेट कारवाईचाही इशाराही दिला होता. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. नव्याने विकसित केलेल्या ॲपला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. मात्र, आता हे ॲपचे बंद पडल्याचे बुधवारी पाहायला मिळाले. दरम्यान, या ॲपसंदर्भात पथ विभागाचे प्रमुख आणि शहर अभियंत्यांना विचारले असता, त्यांना कोणतीच माहिती नसल्याचे समोर आले.

ॲप बंद असल्याचे समोर आले आहे. संबंधित विभागांना तत्काळ हे ॲप सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांसाठी लवकरच हे ॲप कार्यरत केले जाईल. - नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका.

Web Title : पुणे का गड्ढा भरने वाला ऐप विफल; अधिकारी अनजान, नागरिक निराश।

Web Summary : पुणे का 'रोड मित्र' ऐप, गड्ढों की शिकायत के लिए, बंद हो गया है। अधिकारियों को पता नहीं है, जबकि 72 घंटों में मरम्मत का दावा किया गया था। नागरिक निराश हैं, इंजीनियरों से कार्रवाई का वादा किया गया था।

Web Title : Pune's pothole-fixing app fails; officials unaware, citizens disappointed.

Web Summary : Pune's 'Road Mitra' app, meant for pothole complaints, has stopped working. Officials are unaware, despite claims of 72-hour repairs. Citizens are frustrated after initial enthusiasm, promised action and accountability from engineers.