शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

खाणीत दोन मुले बुडाल्याची शक्यता'

By admin | Updated: June 29, 2015 06:41 IST

मुंबई-बंगळुरू महामार्गालगत ताथवडे येथील ममतानगर परिसरात असलेल्या दगडी खाणीत रविवारी दुपारी दोन मुले बुडाल्याची शक्यता परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

वाकड : मुंबई-बंगळुरू महामार्गालगत ताथवडे येथील ममतानगर परिसरात असलेल्या दगडी खाणीत रविवारी दुपारी दोन मुले बुडाल्याची शक्यता परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. याबाबत अग्निशामक दलाला कळविल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी आकडा आणि बोटीच्या साह्याने दिवसभर शोध घेतला. मात्र, चिंध्यांशिवाय हाती काहीच लागत नसल्याने साडेपाचच्या सुमारास शोधकार्य थांबविण्यात आले. ममतानगर परिसरात सुमारे २० वर्षांपूर्वीची जुनी दगड खाण आहे. या खाणीत बाराही महिने पाणी असल्याने जवळच असलेल्या काळाखडक परिसरातील महिला येथे कपडे धुण्यासाठी येतात. वाहनचालक गाड्या धुण्यासाठी येथे गर्दी करतात, तर काही मुले येथे हौसेखातर पोहायला आणि मासे पकडायला येतात. रविवारी दुपारी एकच्या सुमारास येथे काही महिला कपडे धुवत असताना त्यांना पाण्यात काही पडल्याचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, खाणीच्या कडेला दोघांचे कपडे असल्याने उपस्थित महिलांचा संशय अधिकच बळावला. त्यांनी येथे असलेल्या राहुल कांबळे या तरुणाच्या साह्याने पोलीस नियंत्रण कक्षाला दोन मुले बुडाल्याची माहिती दिली. त्यानुसार वाकड पोलीस व रहाटणी अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बघ्यांनीही खाणीच्या चारही बाजूंनी मोठी गर्दी केली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी दुपारी तीनपर्यंत आकड्याच्या साह्याने शोध सुरू ठेवला. मात्र, काहीही हाती न लागल्याने त्यांनी बोटीच्या साह्याने शोध सुरू केला. मात्र, सायंकाळी साडेपाचपर्यंत काहीही न सापडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. (वार्ताहर)