शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत साहित्य संमेलनाची शक्यता धूसर

By admin | Updated: July 9, 2015 02:55 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना अनोखी भेट देण्याच्या हेतूने ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा योग बारामतीला.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना अनोखी भेट देण्याच्या हेतूने ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा योग बारामतीला जुळून येण्यासाठी साहित्य परिषदेची बारामती शाखा ‘गुडघ्याला बाशिंग’ लावून बसली असली, तरी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र पुन्हा जिल्ह्यातच संमेलन घेण्याची शक्यता जवळपास फेटाळून लावली आहे. दोन वर्षांपूर्वी पुरंदर तालुक्यातील सासवड गावी संमेलनाचा उत्सव पार पडल्यानंतर पुन्हा बारामतीला संमेलन घेण्याचा कोणताच विचार नसल्याचे संकेत पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे बारामतीकरांच्या आशेवर एक प्रकारे विरजण पडणार आहे. बारामतीमध्ये आजपर्यंत एकदाही साहित्य संमेलन झालेले नाही. शरद पवार यांचा अमृतमहोत्सव असल्याने त्यांना ही अनोखी भेट दिली जाऊ शकते, म्हणून साहित्य परिषदेची बारामती शाखा या ठिकाणी संमेलन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहे. यासाठी महामंडळावर दबावदेखील टाकला जाऊ शकतो. मात्र, यापूर्वीचा इतिहास पाहिला तर युवा साहित्य संमेलनासह पवारांच्याच वाढदिवसाचे औचित्य साधत नाट्यसंमेलनचा घाटही या ठिकाणी घालण्यात आला होता. यातही संमेलनासाठी दोन-तीनच निमंत्रणे आली असती तर बारामतीमध्ये संमेलन घेण्याचा विचारही झाला असता. मात्र यंदाच्या वर्षी ११ निमंत्रणे आली आहेत.त्यामुळे इतरही स्थळांचा विचार केला जाऊ शकतो. तूर्तास तरी पुन्हा बारामतीमध्येच साहित्य संमेलन घेणे शक्य होईल असे वाटत नसल्याचे स्पष्ट संकेत पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. यंदा साहित्य संमेलनासाठी आलेल्या निमंत्रणांमध्ये मराठवाड्यातील हिंगोली, नायगाव, उस्मानाबाद अशी तीन, पिंपरीच्या डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, कलारंग संस्था, कामगार साहित्य संघ अशी तीन, सातारा, बारामती, अक्षरमानव श्रीगोंदा, भालकी (कर्नाटक) आणि अग्रीयुथ फोरम आदी ११ ठिकाणांचा समावेश आहे. मराठवाड्यातील दुष्काळसदृश स्थिती पाहता या ठिकाणी संमेलन होणे तसे दुरापास्त आहे. बेळगावच्या नाट्यसंमेलनाला चढलेला वादग्रस्त रंग पाहता इथे साहित्य संमेलन न घेणेच फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे ११ पैकी सहाच स्थळांचा विचार खऱ्या अर्थाने केला जाणार आहे. त्यातीलही ‘पवारां’च्या गावाला काही प्रमाणात फुलीच मारली जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे संमेलनासाठी केवळ पिंपरी-चिंचवडच्या तीन आणि सातारा, श्रीगोंदा या स्थळांचाच प्रकर्षाने विचार होईल, असे सकृद्दर्शनी दिसत आहे. (प्रतिनिधी)साहित्य महामंडळ पुण्यात आहे म्हणून शहराच्या आसपासच्या स्थळांचा विचार करणे उचित ठरणार नाही. त्यामुळे शहराबाहेरील स्थळांचा प्रामुख्याने विचार केला जाईल. स्थळ निवड समिती काही निवडक स्थळांची पाहणी करेल. त्यानंतर ९ आॅगस्ट रोजी होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत समितीने सुचविलेल्या स्थळांचा विचार केला जाईल.- प्रकाश पायगुडे, प्रमुख कार्यवाह, साहित्य महामंडळ> बारामतीमध्ये आजपर्यंत एकदाही साहित्य संमेलन झालेले नाही. शरद पवार यांचा अमृतमहोत्सव असल्याने त्यांना ही अनोखी भेट दिली जाऊ शकते, म्हणून बारामती शाखा संमेलन घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.> पिंपरी-चिंचवडच्या तीन आणि सातारा, श्रीगोंदा या स्थळांचाच प्रकर्षाने विचार होण्याची शक्यता.