शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘एफटीआय’मधील वाद मिटण्याची शक्यता

By admin | Updated: August 22, 2015 02:14 IST

गजेंद्र चौहान यांची अध्यक्षपदी नियुक्ती आणि इतर प्रश्नांसंदर्भात ७१ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची प्रथमच केंद्रीय पातळीवर सकारात्मक पद्धतीने दखल घेतली

पुणे : गजेंद्र चौहान यांची अध्यक्षपदी नियुक्ती आणि इतर प्रश्नांसंदर्भात ७१ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची प्रथमच केंद्रीय पातळीवर सकारात्मक पद्धतीने दखल घेतली गेल्याने फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) चिघळलेल्या वादावर पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या अडी-अडचणी समजून घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रकल्प मूल्यांकन प्रक्रियेसह अन्य विषयांवर विस्तृत चर्चा झाल्याने संचालक, विद्यार्थी यांच्यासह प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. त्रिसदस्यीय समिती सोमवारपर्यंत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे अहवाल सादर करणार आहे. शुक्रवारी प्रथमच आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने एस. एम. खान, अंशू सिन्हा आणि सी. राजनाथ यांची समिती शुक्रवारी संस्थेत आली. या समितीने केवळ स्टुडंट असोसिएशनशीच नव्हे, तर टीचर्स आणि कर्मचारीवर्गाशीही चर्चा केली. एस. एम. खान म्हणाले, ‘‘संस्थेतील पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची त्वरित पूर्तता करणे, कर्मचारी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या समस्या यांसारख्या विषयांवर चर्चा झाली. प्राध्यापकांकडून काही चांगल्या सूचनाही मिळाल्या. या चर्चेनंतर चांगलेच निष्पन्न होईल, याबाबत आम्ही आशावादी आहोत.’’ आंदोलनाचे नेतृत्व करणारा विकास अर्स म्हणाला, ‘‘सोमवारपर्यंत चांगल्या निकालाची वाट पाहू. माझ्यासह राहत, सचित, शिनी, रणजित नायर, अजयन अडार असे सात जण चर्चेमध्ये सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)