शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय वादात भोर शहर झाले भकास!

By admin | Updated: August 10, 2015 02:59 IST

नगरपलिकेतील नगरसेवक आणि नगराध्यक्षा यांच्या वादात दोन वर्र्षांपासून भोर शहरातील विकासकामे ठप्प आहेत. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे,

भोर : नगरपलिकेतील नगरसेवक आणि नगराध्यक्षा यांच्या वादात दोन वर्र्षांपासून भोर शहरातील विकासकामे ठप्प आहेत. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, पाणडी दिवसाआढ तेही गढूळ येत आहे. घंटागाड्या बंद असल्याने केरकचरा रस्त्यावर पडत घाणीचे साम्राज्य झाले आहे. पलिकेवर कोणाचा अंकुश राहिला नसून जनता मात्र वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. नगर परिषदेतील राजकारण शहरातील विकासकामांना खीळ घालणारे ठरत आहेत. नगराध्यक्षा आणि नगरसेवक यांच्यातील वाद टोकाला गेल्याने शहरातील प्रश्न दुर्लक्षित राहिले आहेत. अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. मात्र, नगराध्यक्षा आणि नगरसेवक एकमेकांना कोर्टात खेचण्याची एकही संधी सोडत नाहीत. या वादात नगराध्यक्षांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने आणखी भर पडली आहे. भोर नगरपलिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शहरातील नागरिकांनी १७पैकी १३ जागा काँग्रेसला देऊन स्पष्ट बहुमत दिले. तर राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. पहिल्यांदा दीपाली शेटे नगराध्यक्षा झाल्या. मात्र, सहा महिन्यांतच नगरसेवक आणि त्यांच्यात वादाला सुरुवात झाली. दोघांतील वाद इतका टोकाला गेला, की नगराध्यक्षांनी नगरसेवकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, तर नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम केल्याची याचिका जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करून नगराध्यक्षांचे पदही घालवले. मात्र सर्वसामान्य नागरिक मूलभूत सुविधांसाठी भरडत आहेत. (वार्ताहर)