आई वडिलांना शेतात डबा घेऊन जाणाऱ्या तरुणाला पोलीस कर्मचाऱ्याची अमानुष मारहाण; अवसरी बुद्रुक येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 06:12 PM2020-04-06T18:12:36+5:302020-04-06T18:14:42+5:30

या घटनेची गंभीर दाखल घेत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची पुण्यामध्ये तडकाफडकी बदली

Policeman brutally assaulted by young man who going to tifin for elderly parents; Events at Avsari Budruk | आई वडिलांना शेतात डबा घेऊन जाणाऱ्या तरुणाला पोलीस कर्मचाऱ्याची अमानुष मारहाण; अवसरी बुद्रुक येथील घटना

आई वडिलांना शेतात डबा घेऊन जाणाऱ्या तरुणाला पोलीस कर्मचाऱ्याची अमानुष मारहाण; अवसरी बुद्रुक येथील घटना

Next
ठळक मुद्देहा व्हिडिओ पाहून अनेक नागरिकांची पोलिसाच्या या अमानवी कृत्याबद्दल तीव्र नाराजी

आंबेगाव : अवसरी बुद्रुक येथून गावडेवाडी येथे एक तरुण नातेवाईक मित्रासमवेत वृद्ध आई-वडिलांना जेवणाचा डबा घेऊन मोटरसायकलवरून जात असताना गावडेवाडी फाटा येथे पोस ठाण्याच्या एका पोलिस कर्मचाऱ्याने संबंधित तरुणाची मोटरसायकल अडवून त्याला अमानुषपणे मारहाण केली. ही घटना शुक्रवारी ( दि. ३ ) दुपारी घडली. पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ एका सजग नागरिकाने सोशल मीडियावर टाकला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नागरिकांनी पोलिसाच्या या अमानवी कृत्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दाखल घेत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची पुण्यामध्ये  तडकाफडकी बदली करत त्यावर कारवाई केली आहे. 

अवसरी बुद्रुक येथून गावडेवाडी येथे एक तरुण नातेवाईक मित्रासमवेत वृद्ध आई-वडिलांना जेवणाचा डबा घेऊन मोटरसायकलवरून जात असताना गावडेवाडी फाटा येथे पोलिस ठाण्याच्या एका पोलिस कर्मचाऱ्याने संबंधित तरुणाची मोटरसायकल अडवून त्याला मारहाण केली. संबंधित तरुण माझे आई-वडील शेतात काम करत आहे . त्यांना जेवणाचा डबा घेऊन चाललो आहे असे सांगूनही पोलीस मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्या पोलिसाने अक्षरक्ष: काठीने त्या तरूणाला मारहाण केली . त्याने पोलिसाचे समाधान न झाल्याने तरुणाच्या थोबाडीत देखील मारली. एवढे होऊनही संबंधित तरुण सॉरी म्हणूनही पोलिसाच्या हातापाया पडत होता, 'आम्ही पण माणूस आहे ' अशी विनंती करूनही पोलीस मात्र त्याला मारत होता . हा व्हिडीओ सोशल मीडियावर एका सजग नागरिकाने टाकला आहे. हा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून नागरिकांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. 
        मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित पोलिसाने केलेल्या मारहाणी बद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून या प्रकरणाची चौकशी करून वरिष्ठांना अहवाल पाठवणार असल्याचे सांगितले.
आंबेगाव तालुक्यात उमटले तीव्र पडसाद यापूर्वी बोरवाडी येथे एका किराणा दुकानदाराच्या कर्मचाऱ्यांना अशीच मारहाण केली होती. 

Web Title: Policeman brutally assaulted by young man who going to tifin for elderly parents; Events at Avsari Budruk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.