पुण्यात भाजपाच्या माजी आमदारासह चार नगरसेवकांना पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 06:00 PM2020-10-05T18:00:03+5:302020-10-05T18:00:23+5:30

स्वारगेट पाणीपुरवठा विभागात तोडफोडीचे प्रकरण

Police were arrested Former Bjp mla with 4 coporator in the pune | पुण्यात भाजपाच्या माजी आमदारासह चार नगरसेवकांना पोलिसांकडून अटक

पुण्यात भाजपाच्या माजी आमदारासह चार नगरसेवकांना पोलिसांकडून अटक

Next
ठळक मुद्देसत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर आंदोलनाची वेळ 

पुणे : महापालिकेमध्ये भाजपची सत्ता असूनही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना पाण्याकरिता आंदोलन करण्याची वेळ आली आहे. पुण्याच्या दक्षिण भागाला सुरळीत पाणी मिळावे याकरिता स्वारगेट पाणीपुरवठा विभागात भाजपने आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, कार्यालयाची तोडफोड करण्यात आली तसेच अधिकाऱ्यांना दमबाजी करीत शिवीगाळही करण्यात आल्याचा प्रकार घडला.

याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात महापालिकेकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह त्यांची आई नगरसेविका रंजना टिळेकर, राणी भोसले, वृषाली कामठे, मनीषा कदम आणि नगरसेवक वीरसेन जगताप यांना अटक करण्यात आली असून सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

शहराच्या दक्षिण भागात असलेल्या कात्रज, कोंढवा, वानवडी आदी परिसराला वडगाव जलशुद्धीकरण केंद्रामधून पाणी पुरवठा केला जातो. परंतु, मागील काही महिन्यांपासून हा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यासोबतच या भागातील नागरिकांची पाण्याची मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही हाती काहीच लागत नसल्याने भाजपाने माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट पाणीपुरवठा विभागात आंदोलन केले.

हे आंदोलन सुरू असताना कार्यकारी अभियंता आशिष जाधव यांच्याशी श्री आंदोलकांची खडाजंगी झाली. यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि नगरसेवकांकडून अधिकाऱ्यांना संभाजी आणि शिवीगाळ करण्यात आली तसेच कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचाही फोडण्यात आल्या असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांना स्वारगेट पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास स्वारगेट पोलीस करीत आहेत.


पालिकेमध्ये पालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता असून महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेते यांच्यासह विषय समित्यांवर सुद्धा भाजपाचे वर्चस्व आहे. शंभर नगरसेवकांची ताकद असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना आणि माजी आमदाराला पाणी मिळवण्याकरता आंदोलन करावे लागते हे अपयश कोणाचे म्हणावे? मागील तीन वर्षांपासून भाजपची पालिकेत सत्ता आहे. भाजपाच्या सत्ताकाळात या भागाचे आमदार भाजपाचेच होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नगरसेवक आणि राजकीय ताकद असताना सुद्धा दक्षिण पुण्याला पाणी का मिळू शकले नाही असा प्रश्न विरोधी पक्ष उपस्थित करू लागले आहेत.

Web Title: Police were arrested Former Bjp mla with 4 coporator in the pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.