गंगाधाम चौकातील अपघातानंतर पोलिसांकडून जड वाहनांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:57 IST2025-06-18T14:56:17+5:302025-06-18T14:57:00+5:30

या अनुषंगाने शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये वाहनचालक व मालकांवर १३ गुन्हे दाखल करण्यात आले

Police take action against heavy vehicles after accident at Gangadham Chowk | गंगाधाम चौकातील अपघातानंतर पोलिसांकडून जड वाहनांवर कारवाई

गंगाधाम चौकातील अपघातानंतर पोलिसांकडून जड वाहनांवर कारवाई

पुणे : गंगाधाम चौकात जड वाहनांमुळे झालेल्या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करून शहरात प्रवेश करणाऱ्या जड वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये वाहनचालक व मालकांवर १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

गंगाधाम चौक ते कात्रज-कोंढवा रस्त्याकडे ये-जा करणाऱ्या वाहनांचे प्रमाण मोठे आहे. यामुळे गंगाधाम रस्ता वर्दळीचा झालेला आहे. या रस्त्यावर जड वाहनांचेही प्रमाण लक्षणीय आहे. आई माता मंदिराकडून गंगाधाम चौकात येताना रस्त्याचा उतार खूप तीव्र आहे. तीव्र उतारावरून जड वाहने येत असल्याने अपघात होत आहेत.

मागील आठवड्यात गंगाधाम चौकात अपघात होऊन एका महिलेचा जीव गेला. या घटनेनंतर शहरातील रस्त्यावरील जड वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. महापालिकेच्या पथ विभागाने वाहतूक पोलिसांना पत्र देऊन जड वाहनांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. तसेच या अपघातानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली होती. यानंतर आता वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करून रस्त्यांवर येणाऱ्या जड वाहनांवर कारवाई सुरू केली आहे.

Web Title: Police take action against heavy vehicles after accident at Gangadham Chowk