शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

तक्रार घ्यायला कुणीच नसल्याच्या रागाने फोडली पोलीस चौकी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 9:29 PM

वारजे माळवाडी भागात कायम दहशतीचे वातावरण असते. टोळक्याकडून पार्किंग केलेल्या वाहनांची तोडफोड केली जाते. आज या घटनेचा फटका पोलिसांनाच बसला आहे.

पुणे :  पोलीस चौकीत तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलीस नसल्याने चक्क चौकीच फोडल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी(दि.२४ मे) रात्री घडला. वारजे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या रामनगर पोलीस चौकीत हा प्रकार घडला. याप्रकरणी वारजे पोलिसांनी विठ्ठल पडवळ याला अटक केली असून त्याचा साथीदार जाम्या वाघमारे हा पसार झाला आहे़. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनगर परिसरात दोन गटामध्ये झालेल्या भांडणानंतर दोघेजण रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत रामनगर पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आले होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी गस्त घालण्यासाठी बाहेर गेल्याने दोघांना तक्रार द्यायची असल्याने तेथे कोणीच नसल्याने वैतागून त्यातील एकाने चौकीतील टेबलवरील वस्तुने काच फोडली़. बुधवारी रात्री हा प्रकार लक्षात आला नाही़ गुरुवारी सकाळी तोडफोड झाल्याचे लक्षात आले़.  वारजे माळवाडी भागात दोन टोळक्याच्या वादातून कायम दहशतीचे वातावरण असते. किरकोळ वादात अचानक टोळक्याकडून पार्किंग केलेल्या वाहनांची तोडफोड केली जाते. आज या घटनेचा फटका पोलिसांनाच बसला आहे.  याप्रकरणी विठ्ठल पडवळ याला अटक केले असल्याचे वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे यांनी दिली. 

टॅग्स :Warje Malwadiवारजे माळवाडीPolice Stationपोलीस ठाणेCrimeगुन्हा