शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना कारणे दाखवा नोटीस

By admin | Updated: January 8, 2015 00:16 IST

कात्रज येथे उभ्या असलेल्या मोटारीला दोनदा हटकल्याने तीन तरूणांनी पोलिसावर हल्ला करून जखमी केले व सरकारी कामात अडथळा आणला.

पुणे : कात्रज येथे उभ्या असलेल्या मोटारीला दोनदा हटकल्याने तीन तरूणांनी पोलिसावर हल्ला करून जखमी केले व सरकारी कामात अडथळा आणला. या प्रकरणात पोलिसांनी वेळेत आरोपपत्र दाखल न केल्याने न्यायालयाने भारती विद्यापीठ पोलिसांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. दरम्यान यातील तीनही आरोपींची न्यायालयाने १५ हजार रूपयांच्या जामीनावर सुटका केली. ॠषीकेश ऊर्फ बाबू दत्तात्रय पायगुडे (वय १९), रामेश्वर अशोक राजेभोसले (वय २२), अभिजित आत्मराम पायगुडे (वय २२, तिघे राहणार कुडजे ग्रामपंचायतीसमोर, ता. हवेली) अशी आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे नेमणुकीला असलेले गणेश सुभाष चिंचकर याने फिर्याद दिली. ही घटना ५ नोव्हेंबर २०१४ रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. आरोपी हे तिघे एका कारमध्ये होते. त्यांची कार अंधारात उभी असल्याने चिंचकर यांनी त्यांना हटकले व पुढे जाण्यास सांगितले त्यानंतर पुन्हा कात्रज बायपास हायवेवर ते उभे दिसल्याने चिंचकर व त्यांच्या सोबतच्या पोलीस शिपायाने त्यांना हटकून त्यांना पुन्हा तिथून जाण्यास सांगितले. या गोष्टीचा राग येऊन आरोपींनी संगनमत करून त्यांनी चिंचकर यांना दगडाने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केले व सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती. त्याच दिवशी त्यांना न्यायालयासमोर सादर करून त्यांची पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी घेण्यात आली.(प्रतिनिधी)४आरोपींनी अ‍ॅड सुचित मुंदडा यांच्या मार्फत जामीन अर्ज केला. पोलिसांनी कायद्यानुसार ६० दिवस उलटून गेले तरी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले नाही. त्यामुळे आरोपींना जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद अ‍ॅड मुंदडा यांनी केला. न्यायालयाने रिमांडच्या कागदपत्रांची पाहणी केली. त्यावरून आरोपींना अटक झाल्यापासून ते सध्या तुरूंगात असल्याचे स्पष्ट झाले. तसेच घटनेला ६२ दिवस झाले तरी पोलीसांनी आरोपपत्र दाखल न केल्याने आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला.