शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी कारवाई करून सत्य जनतेसमोर आणावे : देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 7:05 PM

Police should take action in Pooja Chavan suicide case and bring the truth before the people: Devendra Fadnavis :राज्य सरकारमधील 'त्या' कथित मंत्र्यासोबतच्या प्रेमसंबंधात निर्माण झालेल्या तणावातूनच पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची शंका

पुणे :  पुण्यातील महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत राहणाऱ्या पूजा चव्हाण  Pooja Chavan suicide या २२ वर्षीय तरुणीने रविवारी मध्यरात्री तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. मात्र पूजेच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. राज्य सरकारमधील 'त्या' कथित मंत्र्यासोबतच्या प्रेमसंबंधात निर्माण झालेल्या तणावातूनच या तरुणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने उचलून धरली आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील पूजेच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून सत्य बाहेर आणावे अशी मागणी केली आहे. 

देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (दि. ११) पुणे महापालिकेच्या वेगवेगळ्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले,पुण्यातील पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली ही बातमी मी वाचली आहे. या प्रकरणात राज्य सरकारमधील एका मंत्र्याचा सहभाग असल्याची चर्चा आहे. हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. या प्रकरणात तात्काळ कारवाई करून पोलिसांनी नि:पक्षपातीपणे चौकशी करावी. तसेच या प्रकरणातले सत्य जनतेसमोर आणावे. एका तरुणीची अशाप्रकारे झालेली आत्महत्या आणि त्याच्याभोवती निर्माण झालेले संशयाचं वर्तुळ आहे ते दडपण्याचा प्रयत्न पोलिसांनी करता कामा नये. 

अठ्ठेचाळीस तास उलटून देखील या प्रकरणी पोलिस कारवाई का करत नाहीत... पुण्यातल्या एका तरुणीने आत्महत्या केली आहे. तिच्या मोबाईलवरुन स्पष्ट होते आहे की तिचे राज्य सरकारमधील एका मंत्र्याशी प्रेमसंबंध होते. त्यात झालेल्या तणावातुनच तिने आत्महत्या केली. पण अठ्ठेचाळीस तास झाले तरी यात गुन्हा नोंदवला गेला नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की यात नातेवाईकांची तक्रार नाही. पण मग पोलीस सुमोटो पद्धतीने गुन्हा का दाखल करत नाही ? की राज्यात कायदा हा विषयच संपला आहे ?असा सवाल पाटील यांनी उपस्थित करतानाच तुम करे सो कायदा असेच सर्व चालले आहे. 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिसState Governmentराज्य सरकारministerमंत्रीPoliticsराजकारणPooja Chavanपूजा चव्हाण