शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अमली पदार्थांचा चार लाखांचा मुद्देमाल पाेलिसांनी केला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:10 IST

पिंपरी : चरससह गांजाचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चार लाख ...

पिंपरी : चरससह गांजाचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चार लाख २९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गुरुवारी (दि. ८) बावधन येथे ही कारवाई केली.

प्रशांत अनिल माळी (वय ३०), तेजस पुनमचंद डांगी (वय २६), सुजित गोरख दगडे (वय २३), राहूल कवडे, समीर शेख (सर्व रा. बावधन बुद्रुक, ता. मुळशी), ओमकार राजेंद्र नगरकर (वय २२, रा. रविवार पेठ, पुणे), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. उपनिरीक्षक राजेंद्र गोविंद महाडिक (वय ५४) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी माळी आणि नगरकर यांच्या ताब्यातील दुचाकीमधून २९८ ग्रॅम गांजा आणि नऊ ग्रॅम चरस हस्तगत केले. डांगी आणि दगडे यांच्या ताब्यातून १२ किलो ४३४ ग्रॅम गांजा इलेक्ट्रॉनिक छोटा वजनकाटा, गांजा पॅकिंग मशिन व रोख रक्कम हस्तगत केली. समीर शेख आणि कवडे यांच्या खोलीतून एक किलो ४२८ ग्रॅम गांजा आणि नऊ ग्रॅम चरस हस्तगत केला.

---------------------------

शिवीगाळीचा जाब विचारल्याने मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : शिवीगाळीचा जाब विचारल्याच्या कारणावरून दगडाने व हाताने मारहाण केली. गांधीनगर, पिंपरी येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. इस्तियाक शेख (वय २०) आणि ऐसाम शेख (वय २५, दोघेही रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मोहम्मद गुलाम कादीर (वय ३१, रा. गांधीनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी हे फिर्यादी यांच्या मेहुणीला शिवीगाळ करीत होते. फिर्यादीने विचारणा केली. त्यामुळे फिर्यादी यांना शिवीगाळ करून दगडाने डोक्यामध्ये मारून जखमी केले.

-----------