शशांक, करिष्मा, लता हगवणे यांचे मोबाईल पोलिसांच्या ताब्यात; वैष्णवीचा छळ केल्याचे पुरावे मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 19:17 IST2025-05-31T19:17:00+5:302025-05-31T19:17:57+5:30

पती शशांक आणि दीर सुशील हगवणे या बंधूनी त्यांची आई लता आणि बहीण करिष्मा यांचे मोबाईल फरार आरोपी नीलेश चव्हाण याच्या मदतीने लंपास केले होते

Police seize mobile phones of Karishma, Lata Hagavane; Will they find evidence of Vaishnavi's harassment? | शशांक, करिष्मा, लता हगवणे यांचे मोबाईल पोलिसांच्या ताब्यात; वैष्णवीचा छळ केल्याचे पुरावे मिळणार?

शशांक, करिष्मा, लता हगवणे यांचे मोबाईल पोलिसांच्या ताब्यात; वैष्णवीचा छळ केल्याचे पुरावे मिळणार?

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात शनिवारी पोलिस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या बावधन पोलिसांनी नीलेश चव्हाण याला त्याच्या पुण्यातील कर्वेनगर येथील घरी नेऊन तपास केला. यात तीन मोबाइल फोन, शस्त्र परवाना, पिस्तूल जप्त करण्यात आले. 

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात गेल्या आठ दिवसांपासून फरार असलेल्या नीलेश चव्हाण याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यात शनिवारी त्याला त्याच्या घरी नेण्यात आले. वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा हगवणे या तिघांचे मोबाइल फोन नीलेश याच्या घरात मिळून आले. ते तीन मोबाइल पोलिसांनी जप्त केले. तसेच घरातील एका खोलीत नीलेश चव्हाण याचे पारपत्र (पासपोर्ट), शस्त्र परवाना आणि पिस्तूल जप्त करण्यात आले. 

नेपाळचे सीमकार्ड  

नीलेश चव्हाण याला अटक केली त्यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी तीन मोबाइल जप्त केले. हे तीन मोबाइल नीलेश वापरत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या मोबाइलवरून नीलेश कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले, याचा तपास करण्यात येणार आहे. तसेच नीलेश याने नेपाळचे सीमकार्ड घेऊन नेपाळी मोबाइल क्रमांक घेतल्याचेही समोर येत आहे. 

नीलेश चव्हाण याच्याकडून यापूर्वी तीन मोबाइल जप्त केले आहेत. तसेच शनिवारी त्याच्या घरातून तीन मोबाइल फोन जप्त केले. जप्त केलेले मोबाइल न्याय वैद्यक (फाॅरेन्सिक लॅब) विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत. -अनिल विभुते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बावधन 

Web Title: Police seize mobile phones of Karishma, Lata Hagavane; Will they find evidence of Vaishnavi's harassment?