पाेलिसांनी चारचाकीला जॅमर लावला ; त्याने चाकच बदललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 20:52 IST2018-11-19T20:50:54+5:302018-11-19T20:52:50+5:30

चारचाकी नाे पार्किंगमध्ये उभी हाेती म्हणून पाेलिसांनी जॅमर लावले. हुशार चालकाने जॅमर लावलेले चाकच बदलले अाणि फरार झाला.

police put a Jamar on cars wheel ; driver changes the wheel | पाेलिसांनी चारचाकीला जॅमर लावला ; त्याने चाकच बदललं

पाेलिसांनी चारचाकीला जॅमर लावला ; त्याने चाकच बदललं

पुणे : पुणे तिथे काय उने असं नेहमी म्हंटलं जातं. पुणेकर काय बाेलतील अाणि काय करतील याचा नेम नसताे. असाच एक अनुभव पुणे वाहतूक पाेलिसांना अाला अाहे. चारचाकी नाे पार्किंगमध्ये उभी हाेती म्हणून पाेलिसांनी जॅमर लावले. हुशार चालकाने जॅमर लावलेले चाकच बदलले अाणि फरार झाला. पाेलीस अाता जॅमर चाेरी करुन गेलेल्या चारचाकी चालकाचा शाेध घेत अाहेत. 

    जंगली महाराज राेडवर रविवारी संध्याकाळी पाऊने सहाच्या सुमारास एमएच 14  एफएस 7729 क्रमांकाची ब्रिझा ही चारचाकी नाे पार्किंगमध्ये लावण्यात अाली हाेती. वाहतूक पाेलिसांनी या चारचाकीला जॅमर लावले अाणि पाेलीस पुढील कारवाईसाठी निघून गेले. चारचाकी चालकाने पाेलिसांशी संपर्क करुन याेग्य ताे दंड भरण्याएेवजी चारचाकीचे चाकच बदलले अाणि जॅमरही चाेरुन नेले. हा प्रकार पाेलिसांच्या लक्षात येताच डेक्कन वाहतुक विभागाचे पाेलीस नाईक प्रमाेद काेकणे यांनी डेक्कन पाेलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली अाहे. या फिर्यादिवरुन अज्ञात चारचाकी मालकावर गुन्हा दाखल करण्यात अाला असून चारचाकीच्या क्रमांकावरुन अाराेपीचा शाेध घेण्यात येत अाहे. 

Web Title: police put a Jamar on cars wheel ; driver changes the wheel