हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर सा.सू. ची कारवाई; वीस जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 13:11 IST2023-12-11T13:11:12+5:302023-12-11T13:11:31+5:30
हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असणारे अवैध धंदे रोखण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागाचा पुढाकार

हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर सा.सू. ची कारवाई; वीस जणांना अटक
किरण शिंदे
पुणे : पुणेपोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर छापा टाकून कारवाई केली. यावेळी पोलिसांनी वीस जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तब्बल 13000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गाडीतळ आणि साडे सतरा नळी भागात चालू असणाऱ्या अवैध धंद्यांवर या कारवाया करण्यात आल्या.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असणारे अवैध धंदे रोखण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागाने पुढाकार घेतला होता. त्यानुसार साडे सतरा नळी आणि गाडीतळ परिसरात जुगार आणि अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक आणि हडपसर पोलीस स्टेशनचे पथक अशा दोघांनी संयुक्त कारवाई करत हे अवैध धंद्यांचे अड्डे उध्वस्त केल. या कारवाईदरम्यान जुगार खेळणाऱ्या आणि अवैध दारू विक्रीत सहभागी असणाऱ्या वीस आरोपींना अटक करण्यात आली.
याशिवाय सामाजिक सुरक्षा विभागाने अवैध धंद्यांविरोधात सहा गुन्हे दाखल करून एकूण 24 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 26 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.