शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

...त्या पोलिसांची चौकशी सुरू

By admin | Updated: September 3, 2015 03:15 IST

बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात असताना दुचाकीवर ‘ट्रिपल सीट’ जाणाऱ्या पोलिसांना मात्र कोणीच हटकले नाही. ही वस्तुस्थिती विशद करणारे

पिंपरी : बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात असताना दुचाकीवर ‘ट्रिपल सीट’ जाणाऱ्या पोलिसांना मात्र कोणीच हटकले नाही. ही वस्तुस्थिती विशद करणारे वृत्त बोलक्या छायाचित्रासह लोकमतने शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध केले. कारवाईची मोहीम सुरू असताना हटकले नाही. लोकमतमध्ये छायाचित्र आल्यानंतरही कारवाईत दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्या पोलिसांविरुद्धच्या कारवाईचे पाऊल उचलले गेले. ज्या दुचाकीवर पोलीस ट्रिपल सीट होते, त्या दुचाकीची नोंदणी अहमदनगर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील असल्याने अहमदनगरला पत्रव्यवहार केला असल्याची माहिती पिंपरी विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी दिली.शिंदे म्हणाले, ‘‘वाहन क्रमांकाच्या आधारे त्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यास वाव मिळाला आहे. दुचाकीवरील एका पोलिसाचे छायाचित्र वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. पोलिसांचा चेहरा ओळखू येईल, असे स्पष्ट छायाचित्र नसल्याने ते पोलीस कोणत्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत, याची माहिती मिळविण्यात अडचणी येत आहेत. ज्या व्यक्तीच्या नावे अहमदनगरला दुचाकीची नोंदणी झाली आहे, त्याच्याकडून त्या पोलिसांचे नाव समजू शकेल. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होईल. शंभर टक्के कारवाई करायची आहे.’’ पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एमएच १६ एक्यू ४६९५ या दुचाकीवरून चक्क पोलीसच ट्रिपल सीट जात असल्याचे छायाचित्र ‘लोकमत’ने टिपले. दुचाकीस्वारासह मध्ये एक आणि शेवटी गणवेशातील पोलीस कर्मचारी असे तीन जण वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांसमोर निघून गेले. त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध केल्यानंतरही कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चित्रीकरणाच्या आधारे वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी वाहनचालकांना घरपोच नोटीस पाठविणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला होता. यानंतर बेशिस्त पोलिसांच्या चौकशीला वेग आला आहे. (प्रतिनिधी)