दौंड : ‘‘पोलिसांची बदनामी होईल, असे कृत्य पोलिसांनी करु नये. पोलिसांना कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही,’’ असे मत पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी व्यक्त केले. नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या दीक्षांत शक्रवारी संचलन समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणेम्हणुन ते बोलत होते. जयस्वाल म्हणाले, पोलिसांवर समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. तेव्हा कर्तव्यातील बेजबाबदारपणा सोडून समाजाची योग्य सेवा करा. देशात महाराष्ट्राच्या पोलिसांचे नावलौकिक आहे. परिणामी या नावलौकिकाला कोठेही तडा जावू देवू नका, परिणामी अंगी टापटिपपणा ठेवून देशाची सेवा करा असे शेवटी जयस्वाल म्हणाले.
पोलिसांना कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही : सुबोधकुमार जयस्वाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 13:57 IST
पोलिसांवर समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. तेव्हा कर्तव्यातील बेजबाबदारपणा सोडून समाजाची योग्य सेवा करा...
पोलिसांना कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही : सुबोधकुमार जयस्वाल
ठळक मुद्देनानवीजला दीक्षांत संचलन समारंभ गेल्यावर्षी शासनाने या केंद्राला २५ कोटींचा निधी दिलेला आहे.