शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दल अधिक लोकाभिमुख करणार

By admin | Updated: October 26, 2015 01:58 IST

न्यायालयामध्ये दोषारोपसिद्धीचे प्रमाण वाढवणे हा आमचा पहिला उद्देश असून, निर्दोष सुटणाऱ्या खटल्यांच्या कारणांचा अभ्यास करून शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी तक्रारदार

पुणे : न्यायालयामध्ये दोषारोपसिद्धीचे प्रमाण वाढवणे हा आमचा पहिला उद्देश असून, निर्दोष सुटणाऱ्या खटल्यांच्या कारणांचा अभ्यास करून शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी तक्रारदार, साक्षीदार आणि पंचनाम्याची व्हिडीओग्राफी करून ‘डिजिटल एव्हीडेन्स’ तयार करण्याच्या सूचना राज्यातील सर्व पोलिसांना देण्यात आल्याची माहिती पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी रविवारी पत्रकारांना दिली.पुण्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या दीक्षितांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची रविवारी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागावी यासाठी शासनाने सक्त आदेश दिले आहेत. पोलिसांकडूनही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असून, सीआयडीचेही विशेष प्रयत्न सुरू आहेत. बऱ्याचदा तक्रारदार, पंच आणि साक्षीदार फितूर होतात, तसेच न्यायालयाच्या मनात शंका निर्माण केल्या जातात, त्यामुळे या सर्वांचे व्हिडीओ चित्रीकरणाच्या सूचना देण्यात आल्याचे दीक्षित म्हणाले. पोलीस ठाणे स्तरावर शांतता मोहल्ला कमिट्यांच्या माध्यमातून कम्युनिटी पोलिसींग चालत होते. मात्र, त्याच्याही पलीकडे जात आता पोलिसांच्या कामात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. समाजाच्या सर्व स्तरातील घटक, सशक्त ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि चांगल्या वर्तणुकीचे नागरिक व महिला यामध्ये सहभागी होऊ शकतात. ज्यांना पोलिसांसोबत काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये नाव व मोबाईल क्रमांक नोंदवावेत, असेही दीक्षित यांनी सांगितले. या पोलीस मित्रांची मदत नाकाबंदी, गस्त, छेडछाड रोखणे, वाहतूक नियमन यासाठी होणार आहे.