पुण्यात पालखी बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 13:58 IST2019-06-28T13:48:19+5:302019-06-28T13:58:12+5:30
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे शहरातून शुक्रवारी पहाटे प्रस्थान होणार होते.

पुण्यात पालखी बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू
पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे शहरातून शुक्रवारी पहाटे प्रस्थान होणार होते. त्याअनुषंगाने पोलीस बंदोबस्तासाठी निघालेले वानवडी परिसरातील पोलीस नाईक मिलिंद मकासरे (रा. वानवडी, वय अंदाजे ३८) यांचा अपघातीमृत्यू झाला.
लष्कर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत असणारे मिलिंद मकासरे हे पालखी बंदोबस्तासाठी दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने निघाले असताना ट्रकच्या धडकेत जागीच ठार झाले. ही घटना आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास फातिमानगर येथील क्रोम मॉल चौकाजवळ झाली.या अपघातात ट्रकचे चाक मकासरे यांच्या डोक्यावरून गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या मृत्यूने पोलीस दलात दु:खाचे वातावरण असून वानवडी पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे.