शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' माथेफिरू पोलिसाच्या निलंबनाचे पोलीस आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 00:44 IST

पोलीस पत्नीच्या निर्घृण खुनाच्या गुन्ह्यातून सबळ पुराव्याअभावी सुटलेल्या माथेफिरू पोलिसाने शेजा-याच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केल्याचा गंभीर प्रकार वडगावशेरी येथे घडला.

विमाननगर : पोलीस पत्नीच्या निर्घृण खुनाच्या गुन्ह्यातून सबळ पुराव्याअभावी सुटलेल्या माथेफिरू पोलिसाने शेजा-याच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केल्याचा गंभीर प्रकार वडगावशेरी येथे घडला. याप्रकरणी जामिनावर बाहेर आल्यावर पुन्हा धमकावल्याप्रकरणी या माथेफिरू पोलिसाच्या निलंबनाचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी दिली. श्रेयस साळवी (वय 38, रा.विश्रांतवाडी) या माथेफिरू पोलिसाने मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सासरवाडी शेजारी राहणारे संदीप रसाळ (वय 36, रा.राजश्री काॅलनी वडगावशेरी) यांना जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून पार्किंगमध्ये शिरून दगडाने डोके फोडले. या मारहाणीत त्यांच्या पत्नी व आईचे मंगळसूत्र तुटले. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी त्याला रात्रीच ताब्यात घेऊन अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. दरम्यान, साळवी याने पुन्हा रसाळ यांच्या इमारतीखाली जाऊन त्यांना धमकावले. साळवी यांच्या कुटुंबीयांनी तो त्यांना देखील त्रास देत असून, मानसिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी चंदननगर पोलिसांना मदत मागितली होती. त्यानुसार त्याला मानसिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी दिली.>कोण आहे श्रेयस साळवी.......श्रेयस साळवी हा शहर पोलीस दलात शिपाई असून, त्याने महिला पोलीस रुपाली साळवी हिचा ऑक्टोबर 2013 रोजी निर्घृण खून केला होता. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात त्याला अटक केली होती. मे 2016 मध्ये न्यायालयाने त्याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. या विरोधात विश्रांतवाडी पोलिसांनी जुलै 2016 मध्ये अपील दाखल केले होते. दाखल करण्यास पात्र नाही म्हणून उच्च न्यायालयाने अपील रद्द केले. न्यायालयातून सुटका झाल्यावर त्याला पोलीस दलात पुन्हा सामावून घेण्यात आले. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून तो मुख्यालयातून कोर्ट आवारात काम करीत होता. गेल्या महिनाभरापासून तो कामावर हजर नव्हता. पोलीस पत्नीच्या निर्घृण खुनासह या माथेफिरू पोलिसाने अनेक गुन्हे केल्याचे समजते. वडगावशेरी येथील मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसरला. या गुन्ह्यासह साळवीचे माथेफिरू पराक्रम लक्षात घेऊन पुन्हा एकदा पुणे शहर पोलीस आयुक्तांनी त्याला निलंबित करण्याचे आदेश दिले.