भोसरीत मद्यपीने घेतला पोलिसांचा चावा

By Admin | Updated: September 25, 2015 01:06 IST2015-09-25T01:06:21+5:302015-09-25T01:06:21+5:30

भोसरी, चांदणी चौकात एका दारूड्याने दुपारी अडीचच्या सुमारास गोंधळ घातला. त्यास अटकाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार पोलिसांना चावा घेऊन त्याने जखमी केले

Police bite taken by alcoholic liquor | भोसरीत मद्यपीने घेतला पोलिसांचा चावा

भोसरीत मद्यपीने घेतला पोलिसांचा चावा

पिंपरी : भोसरी, चांदणी चौकात एका दारूड्याने दुपारी अडीचच्या सुमारास गोंधळ घातला. त्यास अटकाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार पोलिसांना चावा घेऊन त्याने जखमी केले. अखेर त्याला पोलिसांनी थेट वायसीएम रुग्णालयात नेले. झोपेचे इंजेक्शन दिल्यानंतर तो शांत झाला.
मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या नामदेव नाथा शिंदे (वय ३५, रा. मूळ गाव सांगली) याने चांदणी चौक, भोसरी येथे शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नागरिकांनी
याबद्दल आरडाओरड केल्यावर पोलीस त्या ठिकाणी आले. त्याला चार पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने चावा घेऊन त्यांना
जखमी केले. दोरीने हात बांधून
त्यास वायसीएम रुग्णालयात आणण्यात आले. तेथेही त्याने दंगा केला. झोपेचे इंजेक्शन देऊन त्यास शांत करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Police bite taken by alcoholic liquor