शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

नशा करण्यासाठी दराेड्याच्या तयारीत असणाऱ्या टाेळक्याला पाेलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 6:38 PM

नशा करण्यासाठी तसेच दारु पिण्यासाठी पैसे हवे असल्याने येरवडा भागातील टाेळके दराेड्याच्या तयारीत असताना पाेलिसांनी त्यांना अटक केली.

पुणे : नशा करण्यासाठी तसेच दारु पिण्यासाठी पैसे हवे असल्याने येरवडा भागातील टाेळके दराेड्याच्या तयारीत असताना पाेलिसांनी त्यांना अटक केली.  येरवडा भागातील एका सराफाच्या दुकानावर टाेळके दराेडा टाकणार असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी आराेपींना पकडले. त्यांच्याकडे चाैकशी केली असता त्यांनी विविध सहा पाेलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आठ गुन्हे केल्याचे समाेर आले. त्यांच्याकडून पाच लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

सुरज ज्ञानेश्वर जाधव (वय 22), मनाेज बबन गायकवाड (वय 35), आकाश भगवान मिरे (वय 21), विजय काशीनाथ कांबळे (वय 31), सागर दिपक अडागळे ( वय 20), रुपेश दिलीप अडागळे (वय 21 ), अभिजीत अनिल मिसाळ (वय 20, सर्व रा. येरवडा) अशी आराेपींची नावे आहेत. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी 6 च्या सुमारास बंडगार्डन पाेलीस स्टेशनच्या हद्दीत एका निर्जन स्थळी एका व्यक्तिला टाेळक्यांनी अडवून त्यांची साेन्याची चैन व राेख रक्कम लुबाडली हाेती. या गुन्हातील आराेपींचा शाेध घेण्यासाठी तसेच येरवडा पाेलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययाेजनांसाठी येरवडा पाेलीस पथकातील कर्मचारी गस्त घालत हाेते. यात येरवडा तपास पथकातील पाेलीस उप निरीक्षक मंगेश भांगे, पाेलीस नाईक अशाेक गवळी शरद बांगर, पाेलीस शिपाई राहुल परदेशी, सुनिल नागलाेत यांचा समावेश हाेता. हे पथक गस्त घालत असताना अशाेक गवळी आणि शरद बांगर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत एक तडीपार आराेपी त्याच्या साथिदारांसाेबत येरवडा येथील बंगला नं. 5 येथे उभा असून ते येरवडा भागातील साेन्याच्या दुकानावर दराेडा टाकण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती मिळाली. पथकाने त्या ठिकाणी जाऊन टाेळक्याकडे चाैकशी केली असता ते दराेड्याच्या तयारीत असल्याचे समाेर आले. त्यांची पाेलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे 2 लाेखंडी सुरे, एक लाेखंडी राॅड, मिरची पूड, सुती दाेरी असे साहित्य मिळून आले. तसेच त्यांनी बंडगार्डन पाेलीस स्टेशनच्या हद्दीत अलंकार चाैक येथे पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीला मारहाण करुन त्याच्याकडून साेन्याची चेन, राेख रक्कम, सॅक इत्यादी चाेरल्याचे कबूल केले. 

आराेपी हे येरवडा पाेलीस स्टेशन व खडकी पाेलीस स्टेशन येथील रेकाॅर्डवरील आराेपी असून त्यांच्यावर यापूर्वी वाहन चाेरी, जबरी चाेरी, मारामारी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या आराेपींकडून येरवडा, बंडगार्डन, विश्रांतवाडी, सिंहगड, विमाननगर, लाेणीकंद पाेलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आणण्यात पाेलिसांना यश आले आहे. पाेलिसांनी आराेपींकडून 7 दुचाकी, 1 साेन्याची चैन, 1 सॅक, 2 लाेखंडी सुरे, 1 लाेखंडी राॅड, मिरची पुड, सुती दाेरी, अशा पाच लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिसDacoityदरोडा