चॉकलेट सुन्याच्या साथीदारांनी बांधकाम ठेकेदाराला लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 15:49 IST2019-07-16T15:43:52+5:302019-07-16T15:49:30+5:30

कुख्यात कुंड चाॅकलेट सुन्याच्या टाेळी विरुद्ध पाेलीस दलाने माेहीम उघडून अनेकांना अटक केली. त्यात चाॅकलेट सुन्याच्याही पाेलिसांनी मुसक्या आवळल्या. आता त्याच्या आणखी काही साथिदारांनी एका बांधकाम व्यावसायिकाला लुटल्याचे समाेर आले आहे.

police arrested the partners of chocolate sunya | चॉकलेट सुन्याच्या साथीदारांनी बांधकाम ठेकेदाराला लुटले

चॉकलेट सुन्याच्या साथीदारांनी बांधकाम ठेकेदाराला लुटले

पुणे : जनता वसाहतीत निलेश वाडकर याचा निर्घुण खुन केल्यानंतर शहर पोलीस दलाने चॉकलेट सुन्या टोळीविरुद्ध मोहीम उघडून अनेकांच्या मुसक्या आवळल्या. चॉकलेट सुन्यालाही पोलिसांनी अटक केली. असे असेल तरी त्याच्या टोळीतील काही जण अजूनही दिवसा ढवळ्या लुटमार करीत असल्याचे उघड झाले आहे.  खुनासह अनेक गुन्ह्यात वॉटेंड असलेला व चॉकलेट सुन्या टोळीतील नितीन मिटकरी व त्याच्या दोन साथीदारांनी एका बांधकाम ठेकेदाराला लुटल्याचा प्रकार उघड झाला आहे. 

दुचाकीवरुन घरी जात असलेल्या एका बांधकाम ठेकेदाराला तिघा चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत लुटले.  ही घटना स्वारगेट येथील सनी ट्रॅव्हल्सजवळ १३ जुलै रोजी रात्री आठ वाजता घडली. याप्रकरणी बसवराज कन्ने (वय ३०, रा़ इंदिरानगर, गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, कन्ने हे काम संपवून दुचाकीवरुन घरी जात होते. त्यावेळी तिघे जण त्यांच्याजवळ आले व त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या पाकिटातील २४ हजार ५०० रुपये काढून जबरदस्तीने चोरुन नेले. १३ जुलैच्या या घटनेनंतर कन्ने हे घाबरुन गेले होते. शेवटी त्यांनी सोमवारी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली. तेव्हा नितीन मिटकरी याचा कारनामा उघड झाला. गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

Web Title: police arrested the partners of chocolate sunya